Chaus Dictionary Marathi – English चाऊस मराठी- इंग्रजी डिक्शनरी
अब्दुस सलाम चाऊस.
प्रस्तावना
बाजारात एखादा चांगला मराठी-इंग्रजी शब्दकोश उपलब्ध असताना मी पुन्हा त्यात एक नवीन मराठी-इंग्रजी कोशाची भर टाकेन हे माझ्यासाठी अशक्य होतं. या शब्दकोश निर्मितीची सुरुवात फक्त यामुळे झाली की मला बाजारात एकही मराठी-इंग्रजी कोश सापडला नाही. तुम्हाला वाटेल मी हे काय सांगत आहे. कदाचित तुमच्याकडेच दोन चार मराठी-इंग्रजी शब्दकोश असतील.
पण विश्वास ठेवा मी तुम्हाला खरं सांगत आहे. खऱ्या अर्थाने ज्याला मराठी-इंग्रजी कोश म्हणता येईल असा कोश मला अद्याप सापडलेला नाही (तुमच्या हातातील हा कोश सोडून).
मी तुम्हाला उदाहरण सांगतो. माझं उदाहरण. एकदा मी जांभळे खात होतो. त्याच्या आधीही जांभळे खाल्ली होती. पण तेव्हा तसा प्रश्न पडला नव्हता. या वेळेस पडला. तो प्रश्न म्हणजे जांभळांना इंग्रजीत काय म्हणतात. माझ्याकडे इंग्रजी-इंग्रजी, इंग्रजी-मराठी असे भरपूर कोश होते. भरपूर म्हणजे डझन, दोन डझन, किंवा जास्त, किंवा कमी. पण जांभळासाठी इंग्रजी शब्द पाहण्यासाठी त्यांचा काही उपयोग नव्हता. म्हणून मी बाजारातून पहिल्या वेळेस मराठी- इंग्रजी कोश घेऊन आलो. घरी येऊन त्यात ‘जांभूळ’ शब्द काढला तर त्यात ‘जांभळा’ समोर जांभळाचा रंग आणि त्याचा आकार कसा असतो ते सांगितलेलं होतं. मी खात्री करून घेण्यासाठी कोश बंद करून त्या पुस्तकाचं नाव पुन्हा एकदा पाहिलं. मला वाटलं कदाचित घाईघाईत मी दुसरंच कुठलं तरी पुस्तक घेऊन आलो असेन जसे, ‘रंग आणि आकार कोश’ वगैरे (अर्थात माझ्याच चुकीमुळे किंवा जास्तीत जास्त पुस्तकविक्रेत्याच्या चुकीमुळे). पण तसं नव्हतं. त्या पुस्तकावर ‘मराठी-इंग्रजी कोश’ असंच लिहिलेलं मला आढळलं. मी थक्क झालो.
आता तुम्हीच मला सांगा जांभळाचा रंग किती लोकांना माहीत नसेल? जांभळाचा आकार कसा हा प्रश्न किती लोकांना पडत असेल ? आणि या माहितीसाठी कोण मराठी-इंग्रजी डिक्शनरी विकत घेईल?
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862
Reviews
There are no reviews yet.