English Topic Wise Question Papers Analysis – 1984 to 2022 M.J. Shaikh’s
लेखक : एम जे शेख
प्रस्तावना
नमस्कार विद्यार्थी मित्रांनी,
MJ. Shaikh’s English Topic wibe Question Papers Analysis हे पुस्तक तुमच्या हाती देत असताना मला अतिशय आनंद होत आहे. यापूर्वीही तुम्ही माझ्या पुस्तकांना उच्चकोटीचा प्रतिसाद दिल्यामुळे मी तुमचा मनापासून आभारी आहे. आता नवीन येणारे हे पुस्तक विद्यार्थ्यांना नक्कीच आवडेल, यात तीळमात्र शंका नाही. स्पर्धा परीक्षांमध्ये इंग्रजी या विषयांमध्ये विद्यार्थ्यांना कमी गुण मिळतात, तसेच बऱ्याच मुला-मुलींमध्ये इंग्रजी विषयी खूप भीती असते, त्यामुळे हा विषय दुर्लक्षित असतो, म्हणावे तसे लक्ष या विषयाकडे दिले जात नाही व इंग्रजीचा Score कमी येतो. इंग्रजी विषयात मार्क्स कमी येण्याची कारणे काय आहेत, याचा आपण शोध घेतला पाहिजे. माझ्या अठरा वर्षांच्या अध्यापनाच्या अनुभवानुसार आतापर्यंत आयोगाने विचारलेल्या 1984 ते 2022 पर्यंतचे प्रश्नांचे विश्लेषण हे एक अत्यंत महत्त्वाचे गमक आहे, त्यातूनच या पुस्तकाचे विश्लेषण करताना विद्याथ्र्यांचा Mindset कसा होईल, यासाठी पुढील मुद्दे मी या पुस्तकात समाविष्ट केलेले आहेत.
दिलेल्या प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण प्रश्नाखालीच दिलेले आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचा परीक्षा कालावधीत वेळ वाचतो.
आयोगाच्या प्रश्नांच्या माध्यमातून इंग्रजी व्याकरण व शब्दसंग्रह यांची उजळणी करण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त
आहे. बऱ्याच वेळा बरेच प्रश्न Grammar Reles नुसार Repeat होत असतात, त्यामुळे आयोगांच्या प्रश्नांचे स्वरूपानुसार
केलेले विश्लेषण या पुस्तकात चांगल्या पद्धतीने समजावून सांगण्यात आले आहे. अभ्यास करताना आयोगाच्या प्रश्नांची दिशा ठरविण्यासाठी म्हणजेच प्रत्र कशा प्रकारे विचारला जातो हे कळण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. कारण, पुस्तकात दिलेल्या स्पष्टीकरणावरूनच तुमचा बराचसा व्याकरणाचा व शब्दसंग्रहाचा अभ्यासाचा बोजा कमी होणार आहे.
या पुस्तकामध्ये प्रश्नाच्या चारही पर्यायाचे स्पष्टीकरण दिल्यामुळे काय चुकीचे आहे काय बरोबर आहे? हे लक्षात
येऊन प्रत्राचे उत्तर सहज सोडविता येईल व पुढील परीक्षेत येणाऱ्या प्रश्रांचा अचूक अंदाज विद्यार्थ्यांना बांधता येईल.
शब्दसंग्रहाच्या चारही पर्यायाचे मराठीत भाषांतर केल्यामुळे विद्याथ्र्यांची शब्दसंग्रहाची भीती कमी होण्यास मदत होईल.
थोडक्यात परीक्षाभिमुख अभ्यास कसा करावा हे या पुस्तकाचे वैशिष्ठ्य असल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षाकाळात
Finishing Touch करण्यासाठी या पुस्तकाचा विशेष उपयोग होईल म्हणजे परीक्षेला जाता जाता है पुस्तक वाचण्यासाठी अत्यंत उपयुक्त असेल.
M.J. Shaikh’s English Topic wise Question Papers Analysis हे पुस्तक तयार करताना विद्याथ्यांच्या मागणीनुसार तसेच अत्यंत अचूक व योग्य स्पष्टीकरण देण्याचा मी या पुस्तकात प्रयत्न केलेला आहे. जरी नजरचुकीने काही आढळले तरी विद्यार्थी मित्रांच्या सूचनांचे स्वागत करण्यात येईल, तुम्हा सर्व भावी अधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा !!!
Prof. M. J. Shaikh (M.A. English) M.J.SHAIKH’S ENGLISH ACADEMY, PUNE
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 954556786 /02024453065
Reviews
There are no reviews yet.