Ankaganitachi Gurukilli -अंक गणिताची गुरुकिल्ली
₹140.00 Original price was: ₹140.00.₹98.00Current price is: ₹98.00.
Author : Shrinivas Mokalikar
Edition : 2019
Language : Marathi
Publisher: : Pradnyavardhini Prakashan / प्रज्ञावर्धिनी प्रकाशन
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Ganit Guru Ankganit – -Shantaram Ahire -गणित गुरु अंकगणित
लेखक : श्रीनिवास मोकळीकर
याच ‘प्रज्वलित’ आणि शिक्षित युवकांना खुणावत असलेले शाश्वत क्षेत्र म्हणजे सरकारी व निमसरकारी क्षेत्र होय. हे क्षेत्र युवकांना सुरक्षिततेसह सामाजिक प्रतिष्ठा आणि आर्थिक स्थैर्य प्रदान करते, परंतु, याची वाट जाते ती आज या युगाचा परवलीचा शब्द बनलेल्या ‘स्पर्धा’ यातून.
‘जगण्याचा हक्क त्यालाच आहे. जो जगण्याची किंमत मोजू शकतो.’ अशा शब्दांत वर्णिले जाणाऱ्या (Cut-throat) स्पर्धा परीक्षांचा अविभाज्य व महत्वपूर्ण घटक म्हणजे अंकगणित होय. युवकांना अंकगणित हा विषय सुरुवातीला जरी क्लिष्ट, अवघड आणि म्हणूनच अडचणीचा वाटत असला तरी मुळापासून व व्यवस्थित समजावून घेऊन जर उमेदवारांनी तयारी केल्यास हिच ‘अडचण’ त्यांना जास्तीत जास्त (पैकीच्या पैकी गुण मिळवून देऊन बलस्थान ठरेल यात यत्किंचितही शंका नाही. हिच वास्तववादी आशा घेऊन आणि ‘Lines Cures Like’ या उक्तीनुसार माझे परममित्र श्री. श्रीनिवास मोकलीकर गेली अनेक वर्षे पुण्यनगरी पुणेसह महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागात स्पर्धा परीक्षा उमेदवारांना अंकगणितासह विविध विषयासंबंधी मार्गदर्शन करीत आहेत.
श्री. मोकलीकर यांनी महाराष्ट्रभर अंकगणित विषयावर एकदिवसीय कार्यशाळा, विशेष मार्गदर्शन वर्ग, चाचणी परीक्षा, सत्रे इ. उपक्रमांमधून त्यांना उमेदवारांच्या गरजा, अडचणी, प्रश्ने यांची नेमकी उकल झाली आणि यातूनच स्पर्धा परीक्षातील उमेदवारांना शिकवण्याची सोपी तसेच विशिष्ट पद्धत अवगत झाली आहे. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेले त्यांचे विद्यार्थी हे त्याचीच पावती आहे. महाराष्ट्रात अजून स्पर्धा परीक्षांबाबत दिशाहीन व अजागरूक असा मोठा उमेदवार वर्ग आहे. अशाच खेड्यापाड्यातील व शहरातील दुर्दम्य इच्छाशक्ती व क्षमता असलेल्या परंतु योग्य अभ्यासग्रंथापासून वंचित असलेल्या उमेदवारांना आपल्या ज्ञानभंडाराची कवाडे पुस्तकरूपात उघडी करण्याहेतू श्री. गोवलीकर यांनी ‘अंकगणिताची गुरुकिल्ली’ हे पुस्तक लिहिले आहे.
सदरचे पुस्तक प्रामुख्याने एमपीएससी तर्फे होणाऱ्या PSI/STI/ASO या पदांच्या पूर्वपरीक्षेतील अंकगणित या घटकाला समोर ठेवून लिहिले आहे. याशिवाय हे पुस्तक वनसेवा, बँकिंग, पोलीस भरती व तत्सम परीक्षेस अत्यंत उपयुक्त आहे. पुस्तकांमध्ये मुलभूत गणितीय बाबीपासून थेट आयोगाच्या प्रश्नपत्रिकेत विचारलेल्या गणितांचा विस्तृतपणे समावेश आहे. अंकगणिताच्या प्रत्येक उपघटकासाठी स्वतंत्र प्रकरण असून उमेदवारांना सरावासाठी भरपूर गणिते दिलेली आहेत. आयोगाच्या सर्व गणितांचे व्यवस्थित विश्लेषण असून व पुस्तकाची विशेष बाब म्हणजे एकच गणित Detailed Method आणि Shortcut Method अशा दोन्ही प्रकारे सोडवून देऊन उमेदवारांना निवडीची संधी उपलब्ध करून दिली आहे.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 954556786 /02024453065
Language |
---|
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.