Vidyabharti Shikshak Patrata Pariksha TET-Teacher Eligibility Test Paper -2 (महाराष्ट्र राज्य परीक्षा)-Brijmohan Dayma
मनोगत
बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा (2009) अनुसार महाराष्ट्र शासनाने प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य केली आहे. कार्यरत शिक्षकांना या परीक्षेतून सुट देण्यात आली आहे. मात्र भविष्यात शिक्षक होवू इच्छिणाऱ्यांना ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. 1 ली ते 5 वी (पेपर 1) आणि 6 वी ते 8 वी (पेपर 2) अशा दोन गटात परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. केंद्रशासनाने यापूर्वीच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) मार्फत सुरु केली आहे. महाराष्ट्रात या परीक्षेचे आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे (MSCE) करणार आहे.
विसाव्या शतकातील शिक्षणामध्ये आज्ञाधारकपणा, शिस्त, सारखेपणा इत्यादींवर भर होता. एकविसाव्या शतकात मात्र सृजनशीलता, नाविन्यता, आनंददायी शिक्षणावर भर दिला जात आहे. औद्योगिक अर्थव्यवस्थेपासून ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल सुरु झाली आहे. अध्ययन घडून आल्याशिवाय अध्यापन पूर्ण होऊ शकत नाही हा विचार रुजत आहे. औपचारिक अध्ययन पूर्ण झाल्यानंतर व्यक्ती स्वतःच्या पायावर उभा राहण्यास समर्थ व्हावी (Learning is a process which leads to earning) असे मानले जात आहे.
पारंपारिक शिक्षकाची जागा सृजनशील शिक्षकांनी घ्यावी असे अपेक्षित आहे. 4+5=? असे पारंपारिक शिक्षक विचारतो मात्र 9 हे उत्तर येण्यासाठी कोणत्या दोन संख्येची बेरीज करता येईल बरे ? असे सृजनशील शिक्षक विद्यार्थ्यांना विचारू शकतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी विचार करून वेगळे उत्तर देईल. एका पेक्षा अनेक योग्य उत्तरे निघतील. या प्रक्रियेत सर्व विद्यार्थी मनापासून सहभागी होतील. एखाद्या विद्यार्थ्याने 4+5= 5+4 असे सुचविल्यास ‘बेरजेची क्रमनिरपेक्षता’ विद्यार्थ्यांना सांगता येईल. यालाच व्हॅगोत्सकीच्या भाषेत सांमजस्यपूर्ण अध्ययन (Collaborative learning) म्हणतात.
शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे महत्त्वाचे साधन आहे. या सामाजिक परिवर्तनाचा एक शिक्षक म्हणून भाग होऊ इच्छिणाऱ्या सर्वांना परीक्षेसाठी हार्दीक शुभेच्छा !
ब्रिजमोहन दायमा
Available at Ksagar Book Centre or on www.
ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.