Vidrohi Tukaram-A. H. Salunkhe Marathi Book katha-kadambari (Novel) Lokayat (विद्रोही तुकाराम)

Original price was: ₹600.00.Current price is: ₹510.00.

Author           : A. H. Salunkhe 

Edition          : 5 ed 2025

Language    ‏  : Marathi

ISBN               : 9788192728377

Publisher      : Lokayat Prakashan लोकायत प्रकाशन

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Vidrohi Tukaram-A. H. Salunkhe Marathi Book katha-kadambari (Novel) Lokayat (विद्रोही तुकाराम)

मनोगत (दुसरी आवृत्ती)

‘विद्रोही तुकाराम’ हे पुस्तक प्रथम डिसेंबर १९९७ मध्ये प्रकाशित झाले. त्यानंतर वर्ष-सव्वा वर्षात त्याची पहिली आवृत्ती संपली. वाचकांच्या या सुखद प्रतिसादाबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. या पुस्तकाची एक संक्षिप्त आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली असून आता मूळ पुस्तकाची ही दुसरी आवृत्ती काही परिशिष्टांची भर घालून वाचकांच्या हाती देताना मला अत्यंत आनंद होत आहे. या आवृत्तीच्या प्रकाशनाबद्दल मी श्री. गोपाळराव मोकाशी व डॉ. कमल बागाईतकर यांचा आभारी आहे.

या पुस्तकाचे परीक्षण भाई वैद्य यांनी दै. ‘सकाळ’ आणि ‘समाज प्रबोधन-पत्रिका’ (त्रैमासिक) यांमधून केले. डॉ. जया नातू यांनी ‘तरुण भारत’ (बेळगाव) या दैनिकातून आणि प्रा. अशोक चोपडे (वर्धा) यांनी नागपूरच्या ‘बहुजन संघर्ष’ या पाक्षिकातून केले. शिवाय, ‘मराठा मार्ग’ आणि इतर काही नियतकालिकांनी त्याचे काही अंश छापले. पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने केशवराव विचारे पुरस्कार दिला आणि कुडूवाडी येथील कदम गुरुजी वाङ्मय पुरस्कारही प्राप्त झाला. डॉ. यशवंत पाटणे यांनी सातारा आकाशवाणीसाठी मुलाखत घेतली. महाराष्ट्रभरच्या विविध संस्थांनी व्याख्याने आयोजित केली. आदरणीय श्री. निळू फुले यांनी दिलेले प्रोत्साहन तर केवळ अविस्मरणीय म्हणावे लागेल.

दरम्यान काही अभ्यासकांनी टीका केल्याचे निमित्त साधून काही हितसंबंधी संघटनांनी विचारस्वातंत्र्याची गळचेपी होईल, अशा प्रकारचा विरोध सुरू केला. या प्रसंगी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील असंख्य व्यक्ती, संस्था, पत्रकार, संघटना यांनी मला जोरदार पाठिंबा देऊन माझे मनोबळ वाढविले, याचा मी कृतज्ञतापूर्वक उल्लेख करू इच्छितो. सर्वांचाच निर्देश करणे शक्य नसले, तरी काहींचा निर्देश करणे अत्यावश्यक आहे. अण्णा भाऊ साठे अकादमी आणि दलित महासंघ आणि विशेषतः प्रा. शरद गायकवाड यांनी साताऱ्यात मला पाठिंबा देण्यासाठी उपोषण करून विचारस्वातंत्र्याची बाजू घेतली. ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ च्या काही शाखांनी पाठिंबा जाहीर केला. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या म्हणजेच माझ्या महाविद्यालयाच्या प्राध्यापकवृंदाने मला पाठिंबा देणारा ठराव केला. प्रा. मो. नि. ठोके यांनी या बाबतीत विशेष पुढाकार घेतला तसेच मा. प्राचार्य सावंत व प्रा. मोहिते (मराठी विभाग) यांनीही पुढाकार घेतला.

मराठा महासंघाच्या पुणे शाखेने माझ्या पुस्तकाच्या निमित्ताने वाद निर्माण झाल्यावर मला माझी भूमिका मांडण्यासाठी बोलावले आणि त्यानुसार मी ती मांडली. संयोजकांनी माझ्या विरोधकांनाही त्यांची भूमिका मांडण्यासाठी बोलावले होते. त्यांपैकी काहींनी निमंत्रण नाकारले आणि काही जणांनी येऊन माझ्या विरोधी निवेदन सादर करून आपली भूमिका मांडली. या कार्यक्रमाद्वारे मला माझी भूमिका लोकांपुढे ठेवण्याची संधी दिल्याबद्दल अॅड, शशिकांत पवार, श्री. शांताराम कुंजीर आणि श्री. प्रवीण गायकवाड यांचा मी आभारी आहे. त्यानंतर मा. बाबूराव धारवाडे आणि मा. रा. कृ. कणबरकर सर यांनी बागल विद्यापीठातर्फे कोल्हापूर येथे परिसंवाद आयोजित केला. माझ्या विरोधकांनी याही परिसंवादाचे निमंत्रण नाकारले. ज्येष्ठ पत्रकार श्री. जगन फडणीस,

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.