TET Paper Dusra – 15 Prashnapatrika Avashyak Spashtikaranasah-Vinayak Ghayal,Vidya Deshpande
के’ सागरीय
महाराष्ट्र राज्य शिक्षक भरती परीक्षा अर्थात टीईटी (TET) म्हणून सर्वपरिचित असणाऱ्या या परीक्षेची जाहीरात आली आहे. तेव्हा जाहीरात आल्यानंतर सर्वप्रथम परीक्षेचा अर्ज काळजीपूर्वक आणि बिनचूक भरून आपण सर्व जोमाने परीक्षेच्या तयारीला लागू या !
या परीक्षेचा अभ्यास करताना, आपल्या अभ्यासाला योग्य दिशा मिळावी आणि सोबत महत्त्वाच्या प्रश्नांची तयारीही व्हावी, या उद्देशाने २०१३ ते २०२४ च्या आठ पूर्वीच्या प्रश्नपत्रिका आणि सात सराव प्रश्नपत्रिकांचा समावेश असलेला विनायक घायाळ व विद्या देशपांडे लिखित ‘TET पेपर दुसरा १५ प्रश्नपत्रिका’ या पुस्तकाची सहावी आवृत्ती आपल्या हाती सोपवित आहे. या पुस्तकातील विज्ञान व गणित या भागांचे लेखन विनायक घायाळ यांनी तर उर्वरित भागांचे लेखन विद्या देशपांडे यांनी केले आहे.
मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केल्यास आपल्या लक्षात येईल की, सामाजिक शास्त्रांतील विविध घटकांच्या/विषयांच्या तयारीसाठी ‘स्मॉलेस्ट जनरल नॉलेज’ हे पुस्तक खूपच फायदेशीर आहे. मागील प्रश्नपत्रिकांमधील अनेक प्रश्न या पुस्तकातून आलेले आपल्याला दिसतील. तसेच गतवर्षी प्रकाशित झालेले सामान्य विज्ञान हँडबुक १२५० (+) वस्तुनिष्ठ प्रश्न हे विनायक घायाळ यांच्या लेखणीतून साकारलेले पुस्तक पेपर-२ मधील विज्ञानाच्या तयारीसाठी अतिशय उपयोगी आहे. कारण हे पुस्तक संपूर्णतया ६वी ते १२वी च्या पाठ्यक्रमावर आधारलेले आहे. त्याचबरोबर विद्या देशपांडे लिखित ‘आवश्यक मराठी व्याकरण’ हे पुस्तकही मराठी विषयाच्या कमीत कमी वेळात अधिक तयारीसाठी फायदेशीर आहे. विविध के’ सागरीय संदर्भाचा अधिकाधिक अभ्यास करून आपणास या परीक्षेत उज्ज्वल यश मिळावे, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !
mation and the sulting ok
आपलाच, व्ही. एस. क्षीरसागर
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 02024453065
Reviews
There are no reviews yet.