Surve: Narayan Surve yanchi Samagra Kavita-Narayan Surve Marathi Book katha-kadambari (Novel) Kavita Sangrah

Original price was: ₹800.00.Current price is: ₹680.00.

Author           :        Narayan Surve,

Edition          :         5 ed

Language    ‏  :        Marathi

ISBN               :        9788171857548

Publisher      :        Popular Prakashan 

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Surve: Narayan Surve yanchi Samagra Kavita-Narayan Surve Marathi Book katha-kadambari (Novel) Kavita Sangrah

नारायण सुर्वे यांचा पहिला कवितासंग्रह ‘ऐसा गा मी ब्रह्म’, सुर्वे १९५६ पासून – वयाच्या तिसाव्या वर्षापासून कविता लिहू लागले. त्या ‘युगांतर’, ‘नवयुग’, ‘मराठा’ ह्या नियतकालिकांतून प्रसिद्ध होत होत्या. अभिनव प्रकाशनाच्या वतीने १९६० साली हा पहिला संग्रह प्रसिद्ध झाला. त्याला कवी कुसुमाग्रज (वि.वा. शिरवाडकर) यांची प्रस्तावना आहे. ह्या संग्रहाची जुळवाजुळव करताना सुर्वे यांनी त्यांच्या सुरुवातीच्या काही कविता मुद्दाम गाळल्याचे दिसते. अभिनव प्रकाशनाचे वा.वि. भट हे डाव्या चळवळीतील सुर्वे यांचे सहप्रवासी, त्यांनी ज्या आस्थेने हे पुस्तक वाचकांपर्यंत पोचवले त्यासाठी त्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केले पाहिजे.

‘माझे विद्यापीठ’ या दुसऱ्या संग्रहाच्या वेळी मात्र कवी केशव मेश्राम यांच्यामुळे सुर्वे पॉप्युलरकडे आले. त्या वेळी जे ऋणानुबंध जुळले ते सुर्वे यांच्या अखेरपर्यंत. ‘माझे विद्यापीठ’, ‘जाहीरनामा’ आणि ‘नव्या माणसाचे आगमन’ या तीन संग्रहांबरोबरच ‘ऐसा गा मी ब्रह्म’ची नवीन आवृत्तीही पुढे पॉप्युलरनेच प्रसिद्ध केली. १९५६ ते १९९५ या चाळीस वर्षांत या चार संग्रहांमधल्या केवळ १४५ कविता सुर्वे यांनी लिहिल्या असल्या तरीही त्यांच्या प्रत्येक संग्रहाला स्वतःचे असे व्यक्तिमत्व लाभले. यांव्यतिरिक्त त्यांनी हिंदी-उर्दूमधल्या अनेक कवितांचे मराठी अनुवादही केले. या अनुवादित कविता आणि चार संग्रह तयार करताना वगळलेल्या काही कवितांचे संकलन विजय तापस यांनी ‘गवसलेल्या कविता’ नावाने केले. (प्रकाशक प्रदीप कर्णिक, संदर्भ प्रकाशन) संपादक विजय तापस आणि प्रकाशक प्रदीप कर्णिक यांचे हे योगदान महत्त्वाचे आहे.

सुर्वे यांच्या सर्व कविता रसिकांना एकत्रित उपलब्ध व्हाव्यात या हेतूने या श्रेयस् आवृत्तीचे प्रकाशन होत आहे. या ग्रंथात त्यांच्या संग्रहांमधल्या आणि विजय तापस संपादित ‘गवसलेल्या कविता’ मधल्या स्वतंत्र कवितांचा समावेश आहे. अनुवादित कविता या आवृत्तीत घेण्याऐवजी त्यांचे स्वतंत्र संपादित पुस्तक तयार होऊ शकते है लक्षात आल्यामुळे त्यांचा समावेश या आवृत्तीत केला नाही. या कवितेचे वेगळेपण, मराठी काव्य-क्षेत्रातले तिचे स्थान, तिचे सामर्थ्य आणि मर्यादा यांचा आढावा घेणारी चिकित्सक प्रस्तावना सुर्वे यांच्या कवितेचे अभ्यासक प्रा. दिगंबर पाध्ये यांनी या आवृत्तीसाठी मुद्दाम लिहून दिली. सुर्वे यांच्या सर्वच पुस्तकांच्या मुखपृष्ठांना त्यांचे मित्र सुभाष अवचट यांच्या कुंचल्याचा स्पर्श आहे. या आवृत्तीसाठीदेखील ही परंपरा कायमच आहे. विशेष म्हणजे या ग्रंथाचे ‘सुर्वे’ हे शीर्षकदेखील सुभाष अवचट यांनीच सुचवले. या आवृत्तीचे आशयमूल्य आणि सौंदर्यमूल्य वाढवण्यासाठी हातभार लावणाऱ्या या दोघांचेही आम्ही मनापासून आभारी आहोत.

ही आवृती सिद्ध व्हावी आणि परिपूर्ण व्हावी यासाठी अनेकांची बहुमोल मदत झाली. त्यांमध्ये ‘गवसलेल्या कविता’चे संपादक विजय तापस, प्रकाशक प्रदीप कर्णिक आहेत, सुर्वे यांच्यावर झालेल्या लेखनाचे संदर्भ मिळवून देणाऱ्या सुषमा पौडवाल, प्रकाश विश्वासराव, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आणि तेथील सर्व सहकारी आहेत. या सर्वांचे पॉप्युलरतर्फे मनःपूर्वक आभार.

ही आवृत्ती करण्याचे निश्चित झाले त्यानंतर अप्रकाशित कविता-लेख मिळावेत यासाठी सुर्वे यांच्या पत्नी कृष्णाबाई सुर्वे आणि कन्या कल्पना घारे यांच्याशी आम्ही संपर्क साधला. त्यांनी अतिशय आत्मीयतेने त्यांच्याजवळ असलेली कात्रणे आम्हांला दिली. त्यांमध्ये नवीन कविता जरी मिळाल्या नाहीत तरी सुर्वे यांचे अनेक अप्रकाशित लेख आणि भाषणे उपलब्ध झाली. हा सर्व मजकूर ‘माणूस कलावंत आणि समाज’ या त्यांच्या लेखसंग्रहात समाविष्ट करून त्याची नवीन आवृत्तीही लवकरच उपलब्ध होईल.

सुर्वे कुटुंबीयांविषयी पॉप्युलरच्या मनात असलेला जिव्हाळा आणि कृतज्ञता शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे.

नारायण सुर्वे यांच्या पहिल्या स्मृतिदिनी प्रकाशित होणाऱ्या या आवृत्तीसाठी ज्यांचे ज्यांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य झाले त्या सर्वांना मनापासून धन्यवाद.

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.