Vikasache Samajshastra विकासाचे समाजशास्त्र
Vikasache Samajshastra विकासाचे समाजशास्त्र Original price was: ₹180.00.Current price is: ₹135.00.
Back to products
Samatamulak Shashwat Vikasachi Dishadrushti
Samatamulak Shashwat Vikasachi Dishadrushti Original price was: ₹230.00.Current price is: ₹173.00.

Sthanik Swarajya Sanstha : Sanrachana Aani Vyavahar

Original price was: ₹250.00.Current price is: ₹188.00.

Author         :         Dr. Vivek Ghotale

Edition         :        2025

Language  ‏   :       Marathi

Publisher    ‎ :      The Unique Foundation

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Category:
Description

Sthanik Swarajya Sanstha : Sanrachana Aani Vyavahar

स्थानिक स्वराज्य संस्था : संरचना आणि व्यवहार

(स्थानिक पातळीवरील प्रयोग व चळवळींसह)

डॉ. विवेक घोटाळे

पंचायत राज संस्थातील स्त्रियांच्या सहभागाविषयी अभ्यासक प्रा. भास्कर भोळे असे मत व्यक्त करतात की, ‘कधी घराचा उंबरठा न ओलांडलेल्या स्त्रिया एवढ्या मोठ्या प्रमाणावर निवडणूक लढवतात, प्रचार करतात आणि गावाचा, तालुक्याचा आणि थेट जिल्ह्याचा कारभार करतात, ही घटना अभूतपूर्व असून क्रांतिकारक म्हणावी लागेल.’ सुरुवातीला राजकारण हे धकाधकीचे, पुरुषी वर्चस्वाचे क्षेत्र आहे, ते आपल्या स्त्रीजातीला झेपणार नाही अशा भीतीपोटी स्त्रिया निवडणुकीमध्ये उभ्या राहत नसत. पण ७३ व्या घटनादुरुस्तीने हे चित्र बदलले आहे. प्रा. भोळे म्हणतात की, पंचायती राजमुळे ‘महिलांचे भय, संकोच आणि औदासीन्य कमी झाले आहे.’ महिलांच्या विकासाला आणि त्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना अग्रक्रम मिळत आहे.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी स्थानिक संस्थांमध्ये राखीव जागा पूर्वीही होत्याच. या दुरुस्तीने त्यात वाढ झाली शिवाय इतर मागास वर्गासाठी २७ टक्के जागा आरक्षित करण्यात आल्या. महिलांसाठी ३३ टक्के राखीव जागांची तरतूद महिलांच्या राजकीय सहभागाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली. या दुरुस्तीमुळे वंचित दुर्बल घटकांचे आणि महिलांचे प्रतिनिधित्व वाढले.

अभ्यासक प्रा. सुहास पळशीकर यांच्या मते, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राखीव जागांच्या धोरणामुळे स्थानिक शासनाचा चेहरामोहरा अधिक विविधतापूर्ण आणि समावेशक झाला आहे. या घटनादुरुस्तीमुळे तळपातळीवर लोकशाही क्रांती घडून येण्याची आशा कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.

 

 

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.