STEP UP Vedh Chalu Ghadamodi Visheshank September-Swapnil Patil,Dilip Khatekar
विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना नमस्कार,
वेध
मासिक
आपल्याशी Step Up वेधच्या माध्यमातून वारंवार बोलणे होईल, या माध्यमातून आपली भेट होतचं राहील, सर्वप्रथम आमच्या या नवीन उपक्रमाला आपण उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपले आभार. Step Up वेध वार्षिक विशेषांक घेऊन येताना आमची सर्वप्रथम भूमिका चालू घडामोडीच्या अभ्यासाला आमच्याकडून व्यवस्थित एक चौकट उपलब्ध करून द्यावी, म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना किती करावे आणि काय करावे याबद्दल मनात शंका राहणार नाही अशीच होती. या विशेष अंकाला आपला भरभरून प्रतिसाद लाभला, याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
या नवीन मासिकात आम्ही ऑगस्ट मधील सर्व महत्वाच्या चालू घडामोडी उपलब्ध करून देत आहोत. याद्वारे आपल्या पूर्व परीक्षेसाठी जाताना मनात कोणतीही शंका उपस्थित राहणार नाही. याचबरोबर आम्ही यापुढे राज्यसेवा मुख्य परीक्षा जी UPSC च्या धर्तीवर वर्णनात्मक पद्धतीने होणार आहे, त्यासाठी प्रत्येक अंकामध्ये महत्वाचे मुद्दे समाविष्ट करणार आहोत. विशेष लेख उपलब्ध करून देताना प्रत्येक GS च्या विषयाचा कमीत कमी एक लेख उपलब्ध करण्यावर आमचा भर असेल. हे करत असताना आम्ही सरकारच्या वेबसाईट, सरकारचे अहवाल, मराठी तसेच इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र, लोकराज्य, योजना, कुरुक्षेत्र मासिक इत्यादीचा अभ्यास करून हे घटक समाविष्ट करत आहोत. यातील अधोरेखित करण्यायोग्य गोष्ट म्हणजे प्रत्येक लेखात UPSC च्या मुख्य परीक्षेत यावर कसा प्रश्न विचारला गेला होता, आणि MPSC किंवा UPSC च्या मुख्य परीक्षेमध्ये अजून कसा प्रश्न तयार होऊ शकतो, याबद्दल Booster Practice Questions सुद्धा उपलब्ध केला आहे, म्हणजे घटक समजला आणि अभ्यास संपला असं होणार नाही. कारण की STEP UP Academy ही कायमस्वरूपी तुम्हाला अभ्यास आणि आभास यातील फरक काय आहे हे वारंवार सांगत आलेली आहे, तुम्हा विद्यार्थ्यांना कोणत्या मार्गावर आपण चालायचे आहे, याची आवर्जून आठवण करून दिली आहे.
मी अभ्यास करताना किंवा त्यानंतर अधिकारी म्हणून निवड झाल्यावर सुद्धा किंवा त्याही नंतर अधिकारी पदाचा राजीनामा दिल्यानंतर सुद्धा चालू घडामोडी विषयी कायमच चिकित्सक वृत्तीने काम करत राहिलो आहे. कदाचित त्यामुळेच Step Up वेध या कल्पनेला आकार देऊ शकलो. स्वप्नील पाटील सर यांनी ज्या वेगाने या प्रकल्पाला गती दिली आणि अविरत पणे यासाठी काम करत आहेत ते नक्कीच आमच्या सर्व टीम साठी प्रेरणादायी आहे. आम्ही बनवलेले अभ्यास साहित्य कायमच विद्यार्थी मित्रांना स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरले आहे आणि म्हणूनच STEP UP वेध वर तुम्ही सर्व परीक्षार्थिनी फार कमी वेळेत विश्वास ठेवला, याबद्दल आम्ही सदैव आपले ऋणी आहोत.
आता आमची जबाबदारी वाढली आहे, प्रत्येक महिन्याला आपल्याला वेळेवर आणि अधिकाधिक गुणवत्तापूर्ण STEP UP वेध उपलब्ध करून देणे हे आमचे चॅलेंज आहे. आम्ही आमच्या कार्यात सातत्य राखण्यासाठी या उपक्रमाबद्दलची आपली प्रतिक्रिया, आपला अभिप्राय, आपल्या सुधारणा आम्हाला नक्की कळवा. आम्ही सर्व सुचनांचा गांभीर्यपूर्वक विचार करू,
तुम्ही तुमचा अभ्यास छान सुरु ठेवा, येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
All the best. Thank you. Thank you very much.
आपलाच,
दिलीप खाटेकर
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.