Sola Ane (सोळा आणे)-Chi.V. Joshi Marathi Book katha-kadambari (Novel) Continetal

80.00

Author           :    Chi.V. Joshi 

Edition          :    9 ed 

Language    ‏  :    Marathi

ISBN               :    34639

Publisher      :    Continental Prakashan

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Sola Ane (सोळा आणे)-Chi.V. Joshi Marathi Book katha-kadambari (Novel) Continetal

वटाव

ह्या संग्रहातील गोष्टी बहुतेक वेगळाल्या सामविकांच्या दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झाल्या आहेत. नवजीवन, विविधवृत्त, वसंत, हंस, नवयुग, समीक्षक, नवा झंकार, महाद्वार, दीपावली ह्यांच्या संपादकांचे पुनर्मुद्रणास परवानगी दिल्याबद्दल आभार मानणे अवश्य आहे.

ह्या गोहीपैकी ‘पेटीतील गोप्य’ ही मी विद्यार्थिदशेत असताना लिहिलेली आणि प्रेमोद्यान नावाच्या मासिकात प्रसिद्ध झालेली होती. ती एका इंग्रजी गोष्टीवरून रूपांतर केलेली आहे. मूळ लेखकाचे नाव आता आठवत नाही. चालीरीती किंवा स्थानिक परिस्थिती यांचे खून पडलेले दिसतील, ही गोष्ट वाचताना; परंतु मूळ गोष्टीच्या रसाळपणाची आणि उद्बोधकत्वाची कल्पना ह्या नवशिक्या अनुकरणावरून वाचकांस आल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट चिकित्सापूर्वक न वाचता रहस्योद्याहीपणे वाचावी अशी वाचकांस विनंती आहे.

‘निष्फळ क्लेश’, ‘खडीसाखरेचा खडा’, ‘मिळवत्या बायकोचा नवरा’, आणि ‘सारंगीवाला’ ह्या कथांतील घटना प्रत्यक्ष अनुभवाची फळे आहेत. मायेने आणि प्रेमाने सोसलेले कष्ट कित्येकदा सफल होतात, तर कित्येक वेळा फळ येणाच्या उमेदीत ते फुकट जातात. सृष्टिक्रम अत्यंत निघृण आहे, सत्कर्माला किंवा पराक्रमाला यश मिळाले म्हणजे त्याचेच आपण गोडवे गातो आणि यशस्वी कृत्याचीच आठवण समाजास राहते; परंतु व्यर्थ गेलेल्या खटपटीची किंवा क्लेशांचीच संख्या जगात अधिक मोठी आहे. असे जाणूनही प्रेमी किंवा मायाळू माणसे दुसऱ्या जीवाकरिता स्वतःचा जीव तोडून देण्यास तयार होतात. कलम केलेली माया आतड्याच्या पिळाची बरोबरी करू शकत नाही; मोठी माणसे त्याच्याकरिता वरपांगी ममतेचे ढोंग करीत असली तरी लहान मुलांच्या निर्मल अंतःकरणास त्या स्वार्थाचा संपर्क होत नाही; प्रलोभनाच्या जोरावर परक्या जीवाचे मन आपण आपल्याकडे ओढून घेऊ अशी भावना उराशी बाळगण्यात काही अर्थ नाही; आपले ते आपले आणि परके ते परके; आपले जर नसले किंवा असून नाहीसे झाले असेल तर परक्याला कवटाळून आपलेसे करून घेण्याच्या फंदात माणसाने पडू नये. ही सत्ये चितारण्याचा यत्न पहिल्या दोन गोष्टींत केला आहे.

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.