Samajshashtrachi Multatve-Samajshastra Paper-1-S. Y. Sande-IRS-UPSC-MPSC K Sagar (समाजशास्त्राची मुलतत्वे)-Sociology
₹295.00 Original price was: ₹295.00.₹207.00Current price is: ₹207.00.
Author : S. Y. Sande-IRS-
Edition : 1 ed 2026
Language : Marathi
Publisher: : KSagar publications
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Samajshashtrachi Multatve-Samajshastra Paper-1-S. Y. Sande-IRS-UPSC-MPSC K Sagar (समाजशास्त्राची मुलतत्वे)
या वर्षीच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात मूलभूत सुधारणा झाल्या असून हा अभ्यासक्रम आता बशी केंद्र लोकसेवा परीक्षेप्रमाणेच राहणार आहे. यापूर्वी राज्य लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपातच होत होती ती आता परंपरागत वर्णनात्मक पद्धतीची असणार आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा बदल खूपच मोठा म्हणजे अगदी Drastic म्हणावा असा वाटतो. नवीन अभ्यासक्रमानुसार मराठीत पुस्तके नाहीत, असे बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटते किंवा तसा समज पसरलेला आहे. खरे तर, या नव्या अभ्यासक्रमानुसार बहुतेक विषयांवर के’सागर प्रकाशनाने संदर्भ ग्रंथ प्रकाशित केले असून उर्वरित विषयांवर संदर्भ प्रकाशित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
प्रस्तुतचा संदर्भ वैकल्पिक विषय समाजशास्त्र पेपर-एक (विषय सांकेतांक-१०५५) या विषयाच्या अभ्यास-क्रमावर आधारित आहे. एस. वाय. संदे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस (IRS) यांच्या व्यासंगी व अभ्यासू लेखणीतून प्रस्तुतच्या संदर्भाची रचना साकारली आहे.
यूपीएससीने २०१३ ते २०२४ या कालावधीत केंद्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत या विषयावर विचारलेले प्रश्न लक्षात घेऊन प्रस्तुतचा परीक्षाभिमुख संदर्भ साकारला गेला आहे. या संदर्भाची रचना प्रकरणनिहाय व विषयही समजेल अशा पद्धतीने केली आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षेत प्रश्नांची उत्तरे कशा प्रकारे द्यावीत, याचा विचार करूनच प्रस्तुतचा संदर्भ साकारला आहे.
एस. वाय. संदे (IRS) यांनी प्रश्नांची आदर्श उत्तरे कशी असावीत हे दाखवून देतानाच वरील विषयही आपणास सर्वांगांनी समजावून दिला आहे. नव्या पिढीतील या अभ्यासू अन् व्यासंगी युवा लेखकाची भाषा साधी-सोपी अन् सर्वांना समजेलशी आहे. उच्च अधिकारपदावर कार्यरत असूनही अध्ययनाशी असलेली नाळ त्यांनी अगत्य-पूर्वक जपली आहे. त्यामुळे काहीसा रूक्ष अन् किचकट असलेला हा विषय ते सहजगत्या साधा-सोपा बनवून आपलासा करतात.
परीक्षाभिमुख असूनही विषयास पुरेपूर न्याय देणारा हा संदर्भ आपणास आपल्या परीक्षेत उत्तम यश मिळवून देईल, या खात्रीसह आपल्या हाती सोपवीत आहे.
शुभेच्छापूर्वक !
आपला
व्ही. एस. क्षीरसागर
(K’Sagar
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862
| Publication House |
|---|
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.