

Marhati Lavani (मर्हाटी लावणी)-M. V. Dhond Marathi (novel) Book katha-kadambari-Kavita Sangrah
₹450.00 Original price was: ₹450.00.₹383.00Current price is: ₹383.00.
Author : M. V. Dhond
Edition : 2 ed
Language : Marathi
Publisher : Mouj Prakashan
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Marhati Lavani (मर्हाटी लावणी)-M. V. Dhond Marathi (novel) Book katha-kadambari-Kavita Sangrah
या आवृत्तीसंबंधी
बत्तीस वर्षापूर्वी प्रकाशित झालेल्या पहिल्या आवृत्तीला (१९५६) (१) “‘लावणी ‘थी व्युत्पत्ती-नृत्याच्या अंगाने (१९६४), (२) “लावणीचे कुछ आणि शील ” (१९६७), आणि (३) “कलगीतुरा (१९७३) या तीन लेखांची पुरुणी जोडून ही दुसरी आवृत्ती सिद्ध केली आहे. पुरवणीतील लेखांत माझे १९५६ नंतरचे लावणीविषयक सर्व संशोधन समाविष्ट झाले आहे.
पहिल्या आवृत्तीचे पुनर्मुद्रण करताना तिच्यातील मुद्रणदोष दुरुस्त केले आहेत, त्याचप्रमाणे लावण्यांतील काही पाठ आणि टिपांतील काही अर्थही बदलले आहेत. पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाल्यावर ‘लोकसत्ते ‘च्या १९५७ च्या दिवाळी अंकात श्री० य० न० केळकर यांनी ‘महऱ्हाटी लावणी ‘चें पाठपरीक्षण” या शीर्षकाचा एक अतिविस्तृत लेख लिहून, त्यात लावण्यांच्या बऱ्याच पाठांवर आणि टिपांतील काही अर्थावर आक्षेप घेतले होते. शिव-पेशवेकालीन मराठी भाषा आणि शाहिरी वाड्यय यांचा श्री० केळकरांचा दीर्घ व सखोल व्यासंग लक्षात घेता, त्यांचे आक्षेप विचारात घेणे प्राप्तच होते. त्यांच्या आक्षेपांचा परिपूर्ण विचार करून त्यांनी सुचविलेले जे. पाठ आह्य वाटले ते प्रस्तुत पुनर्मुद्रणात त्या त्या स्थळी मी दुरुस्त करून घेतले आहेत. परंतु त्यांनी सुचविलेले बरेच पाठ मला ग्राह्य वाटलेले नाहीत, हेही इथे स्पष्टपणे नमूद केले पाहिजे. त्यांनी सुचविलेल्या बहुतेक पाठांना लिखिताचा काहीही आधार नसला, तरी त्या पाठांनी सहजी अर्थबोध होतो म्हणूनच केवळ ते मूळ पाठ असावेत- नव्हे, आहेतच असा त्यांचा आग्रह आहे. पाठशुद्धिशास्त्रात ही विचारसरणी निषिद्ध मानली जाते, कारण यातूनच नवे अपपाठ निर्माण होतात. शिवाय, अर्थबोधाच्या बाबतीतही श्री० केळकरांची दृष्टी अगदीच बाळबोध थाटाची आहे. ‘प्रीतीचा लावुन तोरा’ (पृ० १३३) ऐवजी ‘प्रीतीचा लावून दोरा’ असा पाठ त्यांनी सुचवावा, हे त्याचे एक ठळक उदाहरण.
शिव-पेशवेकालीन शब्दार्थाच्या बाबतीत त्यांचा अधिकार मान्य करायलाच हवा. तो मान्य करून टिपांत काही अर्थ दुरुस्त घेतले आहेत. परंतु याही बाबतीत केळकरांच्या अधिकाराला काही मर्यादा पडल्या आहेत. प्राचीन मराठी काव्याशी
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.