Mamlatdar nyayalay Adhiniyam, 1906 (मामलेदार न्यायालय अधिनियम, १९०६ )-Sanjay Kundetkar Mamledar Court Act 1906
पुस्तक परिचय
सन १८७६ पासून अस्तित्वात असणारा मामलतदार न्यायालय अधिनियम हा अत्यंत जुना, प्रभावी तरीही दुर्लक्षित अधिनियम आहे. या अधिनियमाचे अधिकार खरंतर दिवाणी न्यायालयाला देता आले असते. परंतु सर्वसामान्य शेतकऱ्याला दिवाणी न्यायलयातील किचकट व वेळखाऊ प्रक्रिया पार पाडणे बरेच अवघड गेले असते आणि मामलतदार (१९६८ पासून तहसिलदार) हा तालुक्याचा प्रमुख, स्थानिक महसूल अधिकारी, तळागाळापर्यंत पोहोचणारा अधिकारी आणि अर्ध न्यायीक अधिकार धारण करणारा अधिकारी असल्यामुळे शासनाला या अधिनियमाचा प्रभावी वापर करण्यासाठी मामलतदारच योग्य वाटला.
मामलतदार न्यायालय अधिनियम हा विशेष अधिनियम (Special Act) असल्यामुळे तो सामान्य कायद्यांपेक्षा (General Act) अधिक प्रभावी आहे. त्याचा अंमल २९.१०.१९०६ पासून झाला.
मामलतदार न्यायालय अधिनियम, १९०६ हा अत्यंत प्रभावी कायदा असून, या पुस्तकात सदर कायद्याची माहिती सोप्या भाषेत देऊन सदर कायद्याबाबत वारंवार विचारली जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे तसेच महत्वाच्या न्यायालयीन निर्णयांचा संदर्भ असा सुरेख संगम करण्याचा प्रयत्न केला आहे.
हे पुस्तक राज्यातील महसूल अधिकाऱ्यांपासून विधीज्ञ मंडळींसाठीही उपयुक्त ठरेल याचा विश्वास वाटतो.
सूचना : हे पुस्तक केवळ मामलतदार न्यायालय अधिनियम १९०६
विषयक ज्ञान सर्वसामान्य वाचकास व्हावे या हेतूने प्रसिद्ध केलेले आहे. अनावधानाने यात राहिलेल्या त्रुटीसाठी प्रकाशक व लेखक-संकलक जबाबदार असणार नाहीत.
पुस्तकातील तरतुदी वाचताना संबंधित कायद्यातील मूळ आणि अद्ययावत तरतुदी विचारात घेणे अभिप्रेत आहे.
हे पुस्तक सर्व सामान्य जनता, वकील मंडळी, महसुली अधिकारी आणि कर्मचारी, कायद्याचे अभ्यासक यांना उक्त कायद्याची जास्तीत जास्त माहिती मिळावी आणि त्यांचा संभ्रम दूर व्हावा या दृष्टीकोनातून जमेल तितक्या सोप्या भाषेत तयार केलेले आहे.
डॉ. श्री. संजय कुंडेटकर उपजिल्हाधिकारी (नि)
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.