

Afava Khari Tharavi Mhanun (अफवा खरी ठरावी म्हणून)-Pradnya Daya Pawar Marathi Book katha-kadambari (Novel) Shabd
₹150.00 Original price was: ₹150.00.₹120.00Current price is: ₹120.00.
Author : Pradnya Daya Pawar
Edition : 2 ed
Language : Marathi
ISBN : 26683
Publisher : Shabd Publication शब्द पब्लिकेशन
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Afava Khari Tharavi Mhanun (अफवा खरी ठरावी म्हणून)-Pradnya Daya Pawar Marathi Book katha-kadambari (Novel) Shabd
‘अफवा खरी ठरावी म्हणून…’ माझ्या एका कवितेचं हे शीर्षक. तेच या कथासंग्रहाला दिलं आहे.
अफवेबद्दलच्या बऱ्याच अफवा आपल्याकडे प्रचलित आहेत. अफवा ही खोटीच असते. ती भयकारी, दहशत माजवणारी, समाजातल्या दुफळ्या रुंदावणारी म्हणजे नकारात्मकच असते इत्यादी. हे तर खरंच. ठायी ठायी आपण ते अनुभवतोही. पण अफवेचं अफवापण हे संपूर्ण सत्य किंवा संपूर्ण असत्य असण्यात नाही तर जे आहे अथवा नाही असं सांगितलं जातं, त्याला ठोस आधार नसणं यात आहे.
तसंच अफवेचं आणखी एक रूप आहे ते म्हणजे ‘पाईप-ड्रीम’चं
दिवास्वप्नांचं. अर्थात दिवास्वप्नांचाही जो अर्थ आपल्या चलनात आहे तेवढी नकारात्मक शेड इंग्रजीतल्या ‘पाईप ड्रीम’ला नाही. थोडं शब्दांशी खेळत सोपंच बोलायचं झालं तर ‘पाईप’मध्ये जरी ‘ड्रिम’ असलं तरी लांबवर का होईना पण पाईपचं दुसरं तोंड खुलं असतं आणि त्या दिशेने ते स्वप्न सत्य बनून उमलण्याची शक्यता असते. हा आशावाद निरंतर जिवंत ठेवणाऱ्या अफवा फैलावणं हे काम यथार्थच ठरावं; कारण दूर क्षितिजावर का होईना पण आदर्शाचा लुकलुकता दीपस्तंभ नसेल तर जगण्याच्या लंब्याचौड्या पाईपमधून प्रवास करणं अवघडच.
माझ्या कथेतील आशयसूत्रांचा, त्यातील सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक पर्यावरणाचा ‘वापर’ कसकसा होईल, हे आज तरी मला माहीत नाही. पण दलित समाजाची स्थिती बघा, कशी झपाट्याने बदलली आहे, ते काय लिहिताहेत, कसं जगताहेत असं जर कुणी या कथांचा आधार घेत म्हटलं तर मी म्हणेन की होय, तशी अफवा प्रसृत करणं हे लेखक म्हणून माझं उत्तरदायित्वच आहे…
. बदलाची आत्यंतिक आस बाळगणारी बाई म्हणून.
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.