Adhunik Bharatacha Itihas Bhag 1 Samadhan Mahajan UPSC-MPSC SM Publication

Original price was: ₹450.00.Current price is: ₹315.00.

Author       :   Samadhan Mahajan

Edition       :   11 ED  ( 2026)

Language ‏  :  Marathi

Publisher: ‎ : SM Publication

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Adhunik Bharatacha Itihas Bhag 1 Samadhan Mahajan UPSC-MPSC SM Publication

मनोगत

प्रिय विद्यार्थी मित्रांनो,

आधुनिक भारताचा इतिहास या पुस्तकाची अकरावी आवृत्ती आपल्या हाती देताना आनंद होत आहे सोबतच जबाबदारीदेखील आहे. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ विद्यार्थी मित्रांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद या पुस्तकाला दिला व इतिहासाचे वन स्टॉप सोल्युशन बनविले, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनः पूर्वक आभार !

आता या नवीन वर्षात अनेक नवीन आवाहन व प्रश्नांना आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. परीक्षा पद्धतीत होत असलेल्या मोठ्या बदलामुळे आपल्याला अभ्यास प्रक्रियेतदेखील बदल करावा लागणार आहे. प्रशासनात देखील दिवसागणिक बदल होत असतात व त्याप्रमाणे विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना तो बदल आत्मसात करावाच लागतो. आपण परीक्षार्थी असतांना परीक्षा पॅटर्न प्रश्नांच्या पद्धतीत बदल, प्रश्नपत्रिकेत बदल, वेळापत्रकात बदल या समस्यांचा सामना करावाच लागतो. एक अथनि भावी प्रशासकीय अधिकाऱ्याची मानसिकता घडविण्यात याबाबी नकळत हातभार लावत असतात.

असो, आता आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षेतील बदल लक्षात घेता व एकूणच अलीकडील आयोगाच्या प्रश्नपत्रिकांतील बदल लक्षात घेता आपल्या पुस्तकाचीदेखील रचना बदलण्यात आली आहे. पूर्वी आधुनिक भारताचा इतिहास या आपल्या एकाच पुस्तकात महाराष्ट्राचा इतिहास, सांस्कृतिक इतिहास व स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास अशा अनेक घटकांचा अंतर्भाव होता.

दहाव्या आवृत्तीपासून आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास व समाजसुधारक आणि आधुनिक भारताचा इतिहास अशी दोन पुस्तके आपल्याला उपलब्ध झालेली आहेत. यामुळे पुस्तकाची रचना सुटसुटीत झाली आहे. ज्यांना केवळ महाराष्ट्राचा इतिहास वाचायचा आहे त्यांना ते वेगळे पुस्तक आहे व हे भारताच्या इतिहासाचे वेगळे पुस्तक आहे.

असे करताना पहिल्याइतकाच दर्जेदार माहिती (कंटेंट) दोन्ही पुस्तकात आहे. उलट या नवीन आवृत्तीत त्यात अधिक भर घालण्यात आली आहे. पुस्तकाची रचना करतांना नेहमीप्रमाणे सर्व परीक्षांसाठी उपयुक्त राहील याची काळजी घेतली आहे. हे पुस्तक आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी योगदान देणाऱ्या एस. एम पब्लिकेशनच्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार. भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांना अगणित शुभेच्छा !

पुस्तकाबद्दल आपल्या काही सूचना व सुधारणा असल्यास नक्की कळवा.

समाधान महाजन (राज्यकर उपायुक्त)

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language
Publication House
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.