

Indias Struggle for Independence Marathi By Bipin Chandra
₹495.00 Original price was: ₹495.00.₹371.00Current price is: ₹371.00.
Author : Bipin Chandra , Mridula Mukherjee , Aditya Mukherjee , Sucheta Mahajan , K.N Panikkar.
Edition : ( 2025 )
Language : Marathi
Publisher: : KSagar publications
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Indias Struggle for Independence Bipin Chandra
के’ सागरीय…
आदरणीय डॉ. बिपन चंद्र, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इतिहास-संशोधक. ‘इंडियाज् स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स’ हा त्यांच्या व त्यांच्या सहकाऱ्यांच्या लेखणीतून साकारलेला ग्रंथ. यातील ज्ञानवैभव पाहून नतमस्तक व्हावं! या ग्रंथाचा अभ्यास करताना डॉ. बिपन चंद्रांमधील आणि एकूणच लेखक-पंचकामधील चिकित्सक इतिहास संशोधक आणि विश्लेषक-विचारवंत आपणास पानोपानी भेटतो. व्यासंगी प्रज्ञेच्या परिणत आविष्काराने आपण मोहून जातो.
प्रस्तुतचा ग्रंथ हा उपरोक्त मूळ इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुबाद. महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मायबोलीच्या पदराखाली हे ज्ञानामृत चाखता यावं, ही त्यामागील भावना !
डॉ. बिपन चंद्र यांच्या मूळ इंग्रजी ग्रंथाचं मराठी भाषांतर करणं आणि ते करताना मूळ आशयाला न्याय देणं हे तर शिवधनुष्य पेलण्याचंच कार्य. डॉ. एम. व्ही. काळे. इतिहास विषयक दहा ग्रंथांचे लेखन आणि अध्यापनाचा दीर्घ अनुभव. त्यांनी ही जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली. त्याबद्दल ते निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत.
बिपन चंद्र सरांनी प्रस्तुतच्या मराठी अनुवादाच्या संपादन-संस्करणाची जबाबदारी आग्रहाने अस्मादिकांवर सोपविलेली. ही जबाबदारी पार पाडण्याचा यथामती प्रयत्न मी केला आहे. ही जबाबदारी पार पाडीत असतानाच आवश्यक तेथे परिच्छेदांना समर्पक शिर्षकही दिली आहेत. अनुवादित ग्रंथाचे संदर्भमूल्य व उपयोगिता त्यामुळे वाढावी, ही अपेक्षा.
मूळ इंग्रजी ग्रंथात महत्त्वाच्या विधानांच्या वा उताऱ्यांच्या पृष्ट्वर्थ संदर्भ टीपा दिल्या आहेत. विस्तार-भयास्तव मराठी अनुवादात त्या वगळल्या आहेत. जिज्ञासूंनी त्यासाठी मूळ ग्रंथ अभ्यासावा.
सर्वश्री मा. कृ. पारधी, अनघा क्षीरसागर-कार्ले, आशिष कालें व अदिती गायकवाड-कदम अशा अनेकांचा हा जगन्नाथाचा रथ ओढण्यास हातभार लागला आहे; त्याचा निर्देश या ठिकाणी करणे अगत्याचे आहे.
आपला,
व्ही. एस. क्षीरसागर
(K’Sagar)
सन्माननीय लेखकांविषयी
आदरणीय बिपन चंद्रजी यांचा जन्म हिमाचल प्रदेशमधील कांग्रा येथे झाला. त्यांचे शिक्षण लाहोरमधील ‘फॉर्मन ख्रिश्चन कॉलेज’ आणि अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील ‘स्टॅनफर्ड विद्यापीठा’त झाले. नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ते ‘मॉडर्न हिस्ट्री’ विषयाचे प्राध्यापक होते आणि तेथेच त्यांनी ‘प्रोफेसर एमेरिटस्’ हे सन्माननीय पदही भूषविले होते. आधुनिक भारतातील राष्ट्रवाद, वसाहतवाद आणि जातीयवाद या विषयांवर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्षपदही भूषविले आहे.
प्रा. मृदुला मुखजर्जी यांचे शिक्षण नवी दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेज आणि जवाहरलाल नेहरू विद्या-पीठात झाले. सध्या त्या याच विद्यापीठातील ‘सेंटर फॉर हिस्टॉरिकल स्टडीज्’ या विभागात ‘मॉडर्न इंडियन हिस्ट्री’ या विषयाच्या प्राध्यापिका आहेत. कृषि इतिहास, शेतकरी आंदोलन तसेच राष्ट्रीय चळवळ या विषयांबद्दल त्यांना विशेष आस्था वाटते.
प्रा. आदित्य मुखर्जी यांचे शिक्षण दिल्लीतील सेंट स्टीफन्स् कॉलेज आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झाले. तेही याच विद्यापीठातील ‘सेंटर फॉर हिस्टॉरिकल स्टडीज्’ या विभागात ‘समकालीन भारतीय इतिहासा’चे अध्यापन करतात, त्यांच्या संशोधनकार्याचे विषय आधुनिक औद्योगिक इतिहास, भांडवलशाहीचा विकास तसेच समकालीन अर्थव्यवस्था आणि राजकारण हे आहेत.
प्रा. के. एन. पणीक्कर यांचे शिक्षण राजस्थान आणि मद्रास विद्यापीठांत झाले. तेही जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील ‘सेंटर फॉर हिस्टॉरिकल स्टडीज्’ या विभागात ‘आधुनिक भारताचा इतिहास’ या विषयाचे प्राध्यापक आहेत. ‘सांस्कृतिक आणि वैचारिक इतिहास’ तसेच ‘कृषि इतिहास’ या विषयांवर त्यांनी विस्तृत लेखन केले आहे.
प्रा. सुचेता महाजन यांचे शिक्षण दिल्लीतील इंद्रप्रस्थ कॉलेज व जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झाले. सिमल्यातील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड् स्टडीज्’ या संस्थेत त्यांनी अध्यापन केले. सध्या त्या दिल्ली विद्यापीठाच्या ‘दिल्ली कॉलेज फॉर आर्टस् अॅड कॉमर्स’ या संस्थेत अध्यापन करीत आहेत. इ. स. १९४० नंतरच्या दशकातील भारतातील राजकीय प्रक्रिया या विषयावर प्रामुख्याने त्यांचे संशोधन केंद्रित आहे.
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862
Publication House |
---|
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.