- This product cannot be added to your cart because it already contains a pre-order, which must be purchased separately.


Aaydaan (आयदान)-Urmila Pawar Marathi Book katha-kadambari (Novel) Granthali
₹300.00 Original price was: ₹300.00.₹255.00Current price is: ₹255.00.
Author : Urmila Pawar
Edition : 2 ed
Language : Marathi
ISBN : 9789391784065
Publisher : Granthali Prakashan
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Aaydaan (आयदान)-Urmila Pawar Marathi Book katha-kadambari (Novel) Granthali
घाटी-डोंगरातून उरीपोटी ओझी वाहून पोट जाळणाऱ्या माझ्या गावाकडच्या बायकांना मला कडे-खांद्यावर घेऊन माझं बालपण साजरं केलं. त्यांच्या ऋणातून अंशतः तरी मुक्त व्हावं असं खूप वाटत होतं. त्या दृष्टीनं बालपण लिहायला घेतलं होतं, ते ‘अबब हत्ती’ या मुलांसाठीच्या दिवाळी अंकात प्रथम १९८९ मध्ये आणि पुढेही तीन-चार वर्षं प्रसिद्ध होत राहिलं.
हे लेखन थोरांसाठीही होऊ शकलं असेल म्हणून ‘अक्षर’, ‘चार्वाक’, ‘प्रेरक ललकारी’ वगैरेंनीही या लेखनाला जागा दिली. माझ्या पहिल्या रात्रीच्या पटकळ अनुभवाला २००२च्या ‘मिळून साऱ्याजणी’नं लोकांसमोर नेऊन माझ्या आत्मपर लेखनाबद्दल उत्सुकता निर्माण केली. वाचकांना ते लेखन आवडलं, त्यातून प्रोत्साहन मिळत गेलं, पण जगण्याच्या इतर गराड्यांत आयुष्याचा पसारा आटोक्यात आणून लिहायला वेळ मिळत नव्हता. उषा मेहता यांनी ते हेरलं आणि मला वेठीसच धरलं. त्यांच्या ‘हंटर’मुळे मी हे आता, माझी साठी अर्ध्या वर्षावर आलेली असताना, लिहून पूर्ण करू शकले. आईकडून आलेलं हे ‘आयदान’ पुढे विणू शकले. प्रमिला शांताराम पवार (शांताराम पवारची बायको), माझी वहिनी निर्मला कृष्णा पवार, तसंच माझी आक्का शांताबाई धर्माजी जाधव आणि भाऊ शाहू अर्जुन पवार यांनी आठवणींना उजाळा दिला. सिसिलिया कार्व्हलो, कुंदा प्र.नि., भागोजी लक्ष्मण जाधव यांनी अधिकउणं सांगितलं. विखरून पडलेल्या ‘आयदाना’च्या ओबडधोबड आकाराला सुबकता आणण्याचं जिकिरीचं काम दिनकर गांगल यांनी करून, ‘आयदान’ उजेडात आणलं. या सर्वांचे औपचारिक शब्द म्हणून आभार, खरं तर, ऋणच !
– उर्मिला पवार
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.