- This product cannot be added to your cart because it already contains a pre-order, which must be purchased separately.


आधुनिक समाजशास्त्रज्ञ
₹495.00 Original price was: ₹495.00.₹371.00Current price is: ₹371.00.
Authors : डॉ. बी. एम. कऱ्हाडे , डॉ. किशोर राऊत
Edition : 2023
Language : Marathi
Publisher : Diamond Publications
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
आधुनिक समाजशास्त्रज्ञ
डॉ. बी. एम. कऱ्हाडे
डॉ. किशोर राऊत
कोणत्याही शास्त्राचा विकास व प्रगतीमध्ये त्यांच्या संज्ञा, संकल्पना व सिद्धांत अत्यंत महत्त्वाचे ठरतात. त्याशिवाय त्या शास्त्राला समाजमान्यता मिळत नाही. त्याच न्यायाने समाजशास्त्रामध्ये अनेक अभ्यासक संशोधक व शास्त्रज्ञांनी खूप मोठे योगदान दिले आहे. त्यांच्यामुळेच भारतातही सर्व विद्यापीठ व महाविद्यालयामधून हा विषय शिकविला जातो व लाखो विद्यार्थी पदव्या घेऊन बाहेर येत आहे. त्या समाजशास्त्र विषयाच्या विकासाकरिता काम करणारे विचारवंत व शास्त्रज्ञ या दृष्टीनेही खूप महत्त्वाचे ठरतात.
‘आधुनिक समाजशास्त्रज्ञ’ हा अभ्यासपूर्वक व महत्वपूर्ण ग्रंथ आपल्या हाती देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या ग्रंथामध्ये जगातील अनेक समाजशास्त्रज्ञांचा उल्लेख केला आहे. ज्यांनी समाजशास्त्रीय संज्ञा, संकल्पना व सिद्धांत विकसित तर केलेच जोडीला अनेक नवनवीन दृष्टीकोनही मांडले आहेत. त्यामुळे समाजशास्त्राला जग मान्यता तर मिळालीच सोबत समाजाचा अभ्यास विषयाचा स्वीकारही केला. ऑगस्त काम्त (१७९८-१८५७) यांनी १८३८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या The Course of Positive Philosophy या ग्रंथात Sociology ही संज्ञा उपयोगात आणली व त्या वेळेपासून अनेक समाजशास्त्रज्ञांनी या विषयाचा पाया भक्कमपणे उभा केला आहे. तो सर्व वैचारिक वारसा साध्या भाषेत आपणा समोर मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. या अभ्यासपूर्ण ग्रंथाचे आपण स्वागत कराल असा आम्हाला विश्वास वाटतो. या ग्रंथामध्ये विल्फ्रेडो परेतो (१८४८-१९२३), थॉर्सटीन वेब्लेन (१८५७-१९२९), जार्ज सिमेल (१८५८-१९१८), चार्ल्स हार्टन कुले (१८६४-१९२९), लिओनार्ड टी. हॉबहाऊस (१८६४-१९२९), ब्रोनिसलॉ मैलीनोवस्की (१८८४-१९४२), पिटीरीम सोरोकीन (१८८९-१९६८), जी.सी. होमन्स (१९१०-१९८९),
व रॉल्फ डहेंडार्फ (१९२९-२००९) या नऊ समाजशास्त्रज्ञांचा समावेश केला आहे.
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.