Smallest General Knowledge TCS -IBPS By Vinayak Ghayal
47 व्या आवृत्तीच्या निमित्ताने….!!
विद्यार्थिमित्रांनो,
TCS-IBPS स्मॉलेस्ट जनरल नॉलेज या लक्षणीय प्रतिसाद लाभलेल्या विद्यार्थिप्रिय संदर्भग्रंथांची ही 47 वी आवृत्ती……
“अद्ययावतता आणि अचूकता हे या संदर्भग्रंथाचे ठळक वैशिष्ट्य…!!
आणि ही वैशिष्ट्ये अबाधित राहावी यासाठी माझ्याइतकेच किंबहुना काहीसे अधिकच, प्रकाशनही जागरूक असते, हे वेगळे सांगावयास नको.
तरीही सामान्यज्ञान आणि चालू घडामोडी या दोन्ही विषय घटकांमध्ये कालानुरूप बदल घडून येत असतात. तेव्हा पुस्तक अगदी छापखान्यात असेपर्यंत हे बदल आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असतो. तथापि, पुस्तक प्रत्यक्ष प्रकाशित झाल्यानंतरदेखील अनेक घडामोडी होत राहतात; परंतु हे नवे बदल नव्या आवृत्तीपर्यंत त्यामध्ये समाविष्ट करणे शक्य नसते. म्हणून….
अशा प्रकारचे ताजे संदर्भ/अपडेट्स आपल्यापर्यंत वेळेवर पोहोचावेत, तसेच TCS-IBPS पॅटर्न नुसार आपणांस सर्व विषयांची तयारी करता यावी, यासाठी…
Vinayak Ghayal Study या यूट्यूब चॅनेलवर आणि लिखित स्वरूपातही ते आपल्याला अभ्यासता यावेत यासाठी https://vinayakghayalstudy.com या संकेतस्थळावर यापुढे आपल्याला मिळत राहतील अशी व्यवस्था आम्ही करीत आहोत. त्यामुळे आपणास नित्यनियमाने या माध्यमांना भेट देऊन आपला अभ्यास अद्ययावत राखता येईल, असा विश्वास वाटतो.
सध्या अनेक परीक्षांच्या जाहिराती येत आहेत, आल्या आहेत आणि आणखी येणार आहेत. तेव्हा गेल्या दोन वर्षांत मनात साचलेली सर्व नकारात्मकता दूर सारून… प्रचंड परिश्रम करणे आपल्याच उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आहे; हे लक्षात घेऊन, आजपासूनच अथक् प्रयत्नांना सुरुवात करू या…!!
आपल्या स्वप्नपूर्तीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा…!!
धन्यवाद
आपला,
विनायक घायाळ
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862
Reviews
There are no reviews yet.