Letest General Knowledge लेटेस्ट जनरल नॉलेज व चालू घडामोडी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांकरिता अभ्यास- क्रमानुसार सुयोग्य रचना केलेली K’Sagar लिखित सर्वच पुस्तके विद्यार्थिवर्गात अतिशय प्रिय ठरली आहेत. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थिवर्गाने केलेल्या मागणीतून व अनेक हितचिंतक मित्रांच्या आग्रहातून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबरोबरच अन्य स्पर्धा परीक्षांनाही उपयुक्त ठरेल, असे हे सर्वसमावेशक व अभिनव रचना- पद्धतीचे पुस्तक साकारले गेले आहे.
‘जनरल नॉलेज’ या विषयावरील एका विशिष्ट अशा पठडीतील पुस्तकांपेक्षा वेगळे असलेले हे पुस्तकही अन्य के सागरीय पुस्तकांप्रमाणेच विद्यार्थि- मित्रांच्या विश्वासास पात्र ठरले आहे. विद्यार्थि- मित्रांच्या या विश्वासातूनच या पुस्तकाची अधिक सुधारित व विस्तारित अशी ही २५ वर्षांच्या कालावधीतील त्र्याऐंशीवी आवृत्ती आपल्या हाती देण्याचा सुयोग आज आला आहे.
अद्ययावतता, अचूकता आणि विशिष्ट अशी लेखनशैली व भाषाशैली या के’सागरीय वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशी ही आवृत्तीही विद्यार्थि- मित्रांच्या विश्वासास पात्र ठरेल व त्यांना त्यांच्या परीक्षेत सुयश मिळवून देण्यात विश्वासू मित्राची भूमिका समर्थपणे अन् प्रभावीरीत्या पार पाडील, असा साधार अन् सार्थ विश्वास वाटतो. त्या विश्वासातूनच हे ग्रंथपुष्प आज आपल्या हाती सोपवीत आहे.
आपला,
व्ही. एस. क्षीरसागर (K’Sagar)
Available at Ksagar Book Centre or onwww. ksagaronline.com or call on 9545567862 / 02024453065
Reviews
There are no reviews yet.