Smrutisthal Vaman Narayan Deshpande स्मृतिस्थळ वा.ना. देशपांडे.
लेखक : वा.ना. देशपांडे.
आधुनिक मराठी वाङ्मयातील एक चिकित्सक टीकाकार व भावदर्शी कवी म्हणून श्री. वा. ना. देशपांडे यांची कीर्ती मोठी आहे. ‘आराधना’, ‘अनामिका’, ‘कोरकू’ इत्यादी काव्यसंग्रहांमुळे किंवा ‘विचारसमीक्षा’ सारख्या टीकालेखांच्या संग्रहामुळे श्री. देशपांडे यांचे नाव मराठीत विशेष प्रसिद्ध आहे. ‘आद्य मराठी कवयित्री’, ‘स्मृतिस्थळ’ यांसारख्या पुस्तकांमुळे महानुभावीय वाङ्मयाचे एक साक्षेपी संशोधक म्हणूनही श्री. वा. ना. देशपांडे यांना ओळखतात.
प्राचीन मराठीत पद्याच्या तुलनेने गद्यग्रंथ आधीच फार अल्प आहेत. महानुभावीय वाङ्मय संशोधनाबरोबर जे काही गद्यग्रंथ उजेडात आले, त्यापैकी महत्त्वाचा म्हणजे ‘स्मृतिस्थळ’ हा होय. प्राचीन गद्याचा म्हणून व तत्कालीन परिस्थितीचे थोडेबहुत दर्शन घडविणारा म्हणून हा ग्रंथ विशेष महत्वाचा मानावा लागेल. महानुभावीय ग्रंथकाराची माहिती देणारा हा एकमेव ग्रंथ असल्याने याची महती अनन्यसाधारण आहे. १९३९ साली याची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली. १९६० साली नव्या संशोधनाचा पूर्ण विचार करून श्री. वा. ना. देशपांडे यांनी दुसरी आवृत्ती तयार केली. आता सुधारित सहावी आवृत्ती प्रकाशित होत आहे. पाठभेद, परिशिष्टे, स्पष्टीकरणार्थ टीपा, शब्दकोश सूची व विवेचक प्रस्तावना यांसह प्रसिद्ध होत असलेल्या या पुस्तकाचा उपयोग मराठीच्या अभ्यासकांना निश्चित होईल अशी खात्री वाटते
UPSC Preparation Books from Marathi Literature ,Main Exam .( Optional ) Available at Ksagar Book Centre or on ksagaronline.com or call on 9545567862
Reviews
There are no reviews yet.