Sastang Nasmkar Acharya Atre साष्टांग नमस्कार हे प्र.के. अत्रे
लेखक : हे प्र.के. अत्रे
प्रस्तावना
‘साष्टांग नमस्कार’ हे माझे पहिले नाटक रंगभूमीवर येऊन आता अठ्ठेचाळीस वर्षे होऊन गेली असली तरी प्रेक्षकांना त्याबद्दल वाटणारे नावीन्य आणि आकर्षण अजूनही कमी झालेले मला आढळत नाही. दरवर्षी या नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राबाहेर कितीतरी ठिकाणी होत असतात ! त्या प्रघातामध्ये अद्यापिही खंड पडलेला नाही याचे मुख्य कारण म्हणजे ज्या छांदिष्टपणाचे आणि नादिष्टपणाचे विनोदी विडंबन मी या नाटकात करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो छांदिष्टपणा आणि नादिष्टपणा अजूनही या ना त्या रूपाने समाजाच्या रोज दृष्टीस पडणारा आहे. ‘साष्टांग नमस्कारा’तल्या अनेक पात्रांचे तोंडवळे समाजाच्या नेहमीच्याच ओळखीचे आहेत आणि त्यांच्या तोंडातून बाहेर पडणारी वाक्ये समाजाने नेहमी कुठेतरी ऐकल्यासारखीच वाटतात. आरंभी आरंभी या नाटकातील विनोद हा वैयक्तिक आहे असा काही टीकाकारांनी आक्षेप घेतला. तथापि इतक्या वर्षांनंतरही या नाटकातल्या विनोदाचे सामर्थ्य ज्याअर्थी कमी झालेले नाही, त्याअर्थी त्या विनोदाचे स्वरूप मलिन आणि प्रासंगिक नव्हते ही गोष्ट आता उघड झालेली आहे. उलट हे नाटक पाहात असताना मनमोकळ्या हास्याचे जे स्फोट प्रेक्षकवृंदामधून एकसारखे उठत असतात त्यातच त्यांचे निर्मळ स्वरूप उत्तम रीतीने प्रकट होत असते. विनोद हे सामाजिक टीकेचे एक प्रभावी पण मनोहर साधन आहे, हे या नाटकाने सिद्ध केले. ते सिद्ध करताना महाराष्ट्रातील ज्या असंख्य प्रेक्षकांनी मला मुक्तकंठांनी साहाय्य केले आणि विनोदाची प्रतिष्ठा वाढविण्यास मदत केली त्यांचा मी अत्यंत ऋणी आहे.
– प्रल्हाद केशव अत्रे
UPSC Preparation Books from Marathi Literature ,Main Exam .( Optional ) Available at Ksagar Book Centre or on ksagaronline.com or call on 9545567862
Reviews
There are no reviews yet.