वैकासिक मानसशास्त्र
डॉ. रा. र. बोरुडे
डॉ. मेघा कुमठेकर डॉ. शीला गोळवलकर
लेखकाचे मनोगत
आवृत्ती पहिली
“वैकासिक मानसशास्त्र” हे पुस्तक वाचकांच्या हाती देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. मानवी जीवनाचा मानसशास्त्रीय अंगाने विचार करण्याबाबत सर्वसाधारण समाज आज बराच सजग झालेला दिसतो. पूर्वी मानवी विकासाचा अभ्यास प्रामुख्याने पहिल्या वीस वर्षाच्या संदर्भात केला जाई. आता मात्र गर्भधारणेपासून से थेट मृत्यूपर्यंतच्या सर्व अवस्थांना आणि विकासाच्या सर्व अंगांना त्या संशोधनाने आपल्या कवेत घेतले असल्यामुळे, मानसशास्त्राचे विद्यार्थी आणि सर्वसामान्य वाचकांनाही हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी :- अलीकडील काही वर्षात विद्यार्थी जगतात मानसशास्त्राची लोकप्रियता विशेष वाढलेली दिसते. तथापि महाराष्ट्रात बहुसंख्य विद्यार्थी मराठी माध्यमातून शिकणारे व मानसशास्त्रावरील अत्याधुनिक ग्रंथ मात्र इंग्रजी भाषेत असल्यामुळे, विद्यार्थी आणि शिक्षक अशा दोघांनाही अडचणीचे होते. ही अडचण काहीशी दूर करण्याचा हा एक प्रयत्न.
प्रस्तुत विषयावर मराठीत लिहिलेली एक-दोन पुस्तके गेल्या वर्षभरात प्रकाशित झाली आहे. परंतु एकाच ग्रंथात विकासाच्या सर्व अवस्थांना समाविष्ट करणारे पुस्तक उपलब्ध नव्हते. या पुस्तकामुळे ती त्रुटी भरून निघेल. लेखन करतेवेळी भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील समाजिक परिस्थिती सतत नजरेसमोर ठेवल्यामुळे, तसेच विवेचनाला पूरक माहिती देणाऱ्या चौकटी, आकृत्या आणि सूचक अशी भरपूर चित्रे समाविष्ट केल्यामुळे विद्यार्थ्यांना हे पुस्तक आवडेल असा विश्वास आहे.
अध्यापकांसाठी :- महाराष्ट्रातील सहाही विद्यापीठातून “वैकासिक मानसशास्त्र” हा विषय बी. ए. च्या प्रथम वा द्वितीय वर्षाच्या वर्गांना सर्वसामान्य अथवा विशेष स्तरावर शिकविला जातो. त्यासाठी बहुतांश ठिकाणी एलिझाबेथ हरलॉक यांचे “डेव्हलपमेंटल सायकॉलॉजी” हेच पुस्तक क्रमिक पुस्तक असेल किंवा प्रमाण मानले जाते. मुख्यतः ह्याच पुस्तकाचा आधार घेऊन व इतर अनेक चांगल्या ग्रंथांचा संदर्भ घेऊन प्रस्तुतचे “वैकासिक मानसशास्त्र” हे पुस्तक तयार झाले आहे. त्याचे आणखी एक वेगळेपण म्हणजे विकासाच्या मानसशास्त्रीय अभ्यासपद्धती आणि विकासाच्या उपपत्ती ही दोन स्वतंत्र प्रकरणे त्यामध्ये समाविष्ट आहेत. म्हणूनच मानसशास्त्र मराठीतून शिकविणाऱ्या सर्व अध्यापकांना आमचे पुस्तक स्वागतार्ह व दिलासा देणारे वाटेल असा आम्हास भरवसा आहे.
बी. ए. च्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अध्यापन महाविद्यालये, समाजकार्य अध्यापन संस्था, मूक-बधिरांच्या अध्यापनाचा व प्रसार माध्यमांचा अभ्यासक्रम, तसेच शुश्रूषा (नर्सिंग) व गृहविज्ञानाचा अभ्यासक्रम इ. विविध ठिकाणी हा विषय या ना त्या स्वरूपात नेमलेला असतो. तिथले विद्यार्थी नि अध्यापक यांनाही हे पुस्तक एक संदर्भ ग्रंथ वा क्रमिक पुस्तक म्हणून उपयुक्त ठरेल.
सामाजिक संस्थांसाठी :- महाराष्ट्र हे विविध प्रकारच्या शेकडो सामाजिक संस्थांचे मोहोळच आहे. रिमांड होम्स्, अनाथालये, महिलाश्रम, वृद्धाश्रम, बालभवन, पालक-शिक्षक संघ, बाल मार्गदर्शन केंद्र, सर्टिफाईड स्कूल्स इ. संस्थांचा संबंध विकासाच्या विशिष्ट समस्येशी येत असतो. तथापि विकासाच्या जटिल प्रक्रियेचे सम्यक् ज्ञान
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 02024453065
Reviews
There are no reviews yet.