Painjan by M N Advant पैजण म.ना. अदवंत
संपादक : म.ना. अदवंत
दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने
‘पैंजण’ची पहिली आवृत्ती ऑगष्ट १९५४ साली प्रसिध्द झाली. जवळ जवळ अठ्ठावीस वर्षांनी तिची दुसरी आवृत्ती प्रकाशित होण्याचा योग येत आहे.
या आवृत्तीत अनेक बदल केले आहेत.
(१) पहिल्या आवृत्तीत कवनांची संख्या १०४ होती. ती कमी करून या आवृत्तीत ती संख्या ६० वर आणली आहे.
(२) प्रत्येक शाहिराची कवने देताना त्यांचा क्रम पण बदलला आहे. प्रथम त्या शाहिरांच्या पौराणिक लावण्या दिल्या आहेत. नंतर लौकिक विषयांवरील लावण्या दिल्या आहेत व शेवटी ऐतिहासिक कवन दिले आहे.
(३) पुष्कळच कवनांतील पाठ बदलले आहेत.
‘पैंजण’ची ही आवृत्ती ‘साहित्य प्रसार केंद्रा’ चे श्री. राजाभाऊ कुळकर्णी यांनी मनावर घेतल्यामुळेच प्रकाशात येत आहे.
नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. वि. बा. प्रभुदेसाई यांनी ही आवृत्ती प्रकाशित व्हावी म्हणून प्रोत्साहन दिले, अनेक मौलिक सूचना केल्या.
या दोघांचे मनःपूर्वक आभार मानणे हे मी माझे कर्तव्य समजतो.
अनेक विद्यापीठांनी एम्.ए. च्या अभ्यासक्रमात ‘पैंजण’चा समावेश केला त्याबद्दल त्या त्या विद्यापीठाचा मी ऋणी आहे.
UPSC Preparation Books from Marathi Literature ,Main Exam .( Optional ) Available at Ksagar Book Centre or on ksagaronline.com or call on 9545567862
Reviews
There are no reviews yet.