Namdevanchi Abhangavani नामदेवांची अभंगवाणी
संपादक :
हेमंत इनामदार निशिकांत मिरजकर निवृत्तीनाथ रेळेकर
‘कविता गोमटी नामयाची ।’
मराठी संत परंपरेत नामदेवांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांचे चरित्र पावन आहे, व्यक्तिमत्त्व प्रसन्न आहे. काव्य रससंपन्न आहे; आणि सांस्कृतिक कार्य केवळ अपूर्व आहे.
या विविध अंगांचे विशेष नेमकेपणाने ध्यानी यावेत, अशा धोरणाने ‘नामदेवांची अभंगवाणी’ या प्रस्तुत संग्रहातील अभंग -वेचे निवडले आहेत. नामदेवांच्या ऋजु-मधुर आणि भावकोमल व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय आणून देतील, असे तीनशेच्या घरातील अभंग शक्य तेवढे पारखून घेतले आहेत.
नामदेवीय अभंगगाथेचा रसग्रहणात्मक काव्यशास्त्रीय अभ्यास करता यावा, अशी दृष्टी या संपादनामागे आहे. आरंभी सविस्तर प्रस्तावना, त्यापुढे काव्यसंहिता आणि अखेरीस आकलन- आस्वादपर टिपणे असे या संग्रहाचे स्वरूप आहे.
UPSC Preparation Books from Marathi Literature ,Main Exam .( Optional ) Available at Ksagar Book Centre or on ksagaronline.com or call on 9545567862
Reviews
There are no reviews yet.