Jevha Mi Jat Chorali Hoti Baburav Bagul जेव्हा मी जात चोरली होती बाबुराव बागुल
लेखक : बाबुराव बागुल
बाबुराव बागुलांच्या कथेतली माणसं ही कुठल्या तरी टोकाला जाऊन पोचलेली आहेत. सूडाच्या, संतापाच्या, दुःखाच्या, दैन्याच्या अशा टोकावर जाऊन पोचलेली आहेत की कुठल्या ‘क्षणी त्यांचा कडेलोट होणार आहे हे कळत नाही. स्वतः बरोबर ती इतर कुणाकुणाला ओढत नेणार आहेत याचाही संभ्रम पडतो. जेव्हा जेव्हा ती अर्धवट, अडाणी असतात तेव्हा तेव्हा तर त्यांच्या आततायीपणाचा अगदी कळस होतो. त्यांच्या तोंडातून कढत वाफेसारखे जहरी शब्द बाहेर फेकले जातात. आंतरिक तळमळीने ती वेड लागल्यासारखी वागतात. ‘पेसूक’, ‘गुंड’, ‘वाटेवरची’, ‘वानर’ या आणि इतर कथांकडे वाचकांनी नजर टाकावी, म्हणजे त्यांना या कथेतल्या माणसांच्या हृदयात केवढी खळबळ माजून राहिली आहे ते दिसेल. बागुलांच्या कथेत अथपासून इतिपर्यंत नाट्य खच्चून भरलेलं आढळेल. – शिरीष पै
UPSC Preparation Books from Marathi Literature ,Main Exam .( Optional ) Available at Ksagar Book Centre or on ksagaronline.com or call on 9545567862
Reviews
There are no reviews yet.