Jan He Wolatu Jethe Sharchandra Muktibodh – जन हे वोळतु जेथे शरदचंद्र मुक्तिबोध
लेखक : शरदचंद्र मुक्तिबोध
ल! चल आता इथून! जे जे पाह्यलं, जाणलं ते ठेव आता पडशीत. हे जिने, या अंधारखोल्या. या चाहुली. खिडकीतले आकाशाचे निळे या गल्ल्या. सदोदित पायाखालचे हे स्नेही रस्ते. वळणं. तुकडे… नदीकाठ. वाटेवरचे असंख्य अनोळखी चेहरे. हे सारं काही ओळखीचं आहे! माझ्यात आहे! सोडवत नाही! ठीक, ठीक! पण आता घुटमळू नकोस.
दुःखाचा लळा, दुःख भोगलं त्या स्थळांचा लळा. भावबंध फार कठीण असतात. ते तुटता तुटत नाहीत. ओळखीच्या दुःखाचा सुरक्षितपणा. हजारो अग्रांनी भुईत मिसळलेल्या रोपांना तंतूतंतू तुटताना होणाऱ्या वेदना कशा असतील?…
ते प्राणभय! पुढं जाणं म्हणजे प्राणभयातून जाणं.
पण मी तर सामान्य. माझी खात्री नाही. मग्दूर नाही. मासळीसारखा तळमळतो आहे. शिणलो आहे. वाट स्पष्ट दिसत नाही. अगदी एकाकी आहे!
प्रत्येक क्षण एकाकी असतो! प्रत्येक मार्ग एकाकी असतो. सापडेपर्यंत
शोधावा लागतो, तोच मार्ग.
UPSC Preparation Books from Marathi Literature ,Main Exam .( Optional )
Available at Ksagar Book Centre or on ksagaronline.com or call on 9545567862
Reviews
There are no reviews yet.