Audyogik Samajshastra -Industrial Sociology :औद्योगिक समाजशास्त्र प्रा.पी.के.कुलकर्णी
लेखक :प्रा.पी.के.कुलकर्णी
जगातील बहुसंख्य विकसित राष्ट्रांत, त्याचप्रमाणे काही विकसनशील राष्ट्रांत औद्योगिकीकरणाची प्रक्रिया पूर्ण झालेली असून त्या जागी नवीन औद्योगोत्तर समाज (PostIndustrial Society) अस्तित्वात आला आहे. भारतापुरता विचार करता, १९९१ सालापासून नवीन आर्थिक धोरणाचा अवलंब केल्यामुळे अन्य क्षेत्रांप्रमाणे उद्योग क्षेत्रातही खाजगीकरणाला प्राधान्य मिळाले आहे. या आर्थिक धोरणांतर्गत उदारीकरण (Liberalization), खाजगीकरण (Privatization) आणि जागतिकीकरण (Globalization) या त्रिसूत्रींचा स्वीकार केल्यामुळे उद्योग क्षेत्रावर झालेल्या परिणामांचा ऊहापोह या पुस्तकात करण्यात आला आहे.
२१व्या शतकातील खाजगीकरणाचा एक परिणाम म्हणजे, आज उद्योगक्षेत्रात वेतनश्रेणीप्राप्त कर्मचाऱ्यांच्या वा कामगारांच्या ऐवजी (Wage Scale Employee or Workers) कंत्राटी कर्मचारी (Contract Workers) किंवा उद्योगबाह्य कामगार (Outsoursing Workers) यांना प्राधान्य दिले जात आहे. या बदलामुळे उद्योग क्षेत्रावर व विशेषतः संबंधित कर्मचाऱ्यांवर झालेल्या परिणामावरही पुस्तकात सविस्तर चर्चा केली गेली आहे.
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065
Reviews
There are no reviews yet.