Bhartiya Arthvyavastha Marathi- Sanjiv Verma
भारतीय अर्थव्यवस्था
केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य नागरी सेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा
केंद्रीय लोकसेवा आयोग आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासार्थीसाठी भारतीय अर्थव्यवस्था या पुस्तकाची प्रस्तुत आवृत्ती पूर्वीच्या आवृत्त्यांपेक्षा सरस आहे. अर्थशास्त्र विषयाशी ज्यांची अजिबात ओळख नाही किंवा तोंडदेखली ओळख आहे अशांनाही हा विषय समजावा या हेतूने विषयाची मांडणी केली आहे. प्रस्तुत पुस्तकात सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र या विषयांबाबत पुरेसा तपशील आहे. परंतु, असे करताना, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पटलावरील अलीकडच्या आर्थिक घडामोडींवर भर दिला आहे.
नागरी सेवा परीक्षांच्या अभ्यासक्रमातील अलीकडचे बदल ध्यानात घेऊन सुधारित आवृत्तीमध्ये लेखकांनी अनेक नव्या प्रकरणांची भर घातली आहे. यामुळे विषयाचा आवाका आणि व्याप्ती वाढण्यास मदत झाली. नागरी सेवा परीक्षार्थीसाठी ही आवृत्ती उपयुक्त ठरावी म्हणून विषय घटकांचे पुनरावलोकन करून अद्ययावत आवृत्ती निर्माण करण्यात आली.
मूळ लेखक संजीव वर्मा दिल्ली, बेंगळूरू, हैदराबाद सारख्या शहरांतील प्रमुख नागरी सेवा परीक्षा प्रशिक्षण केंद्रांमध्ये अध्यापन करत असत. ते प्रतिष्ठित दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे माजी विद्यार्थी होते. त्यांच्या अध्यापन क्षेत्रातील दहा वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी हजारो नागरी सेवा परीक्षार्थीना अध्यापन केले.
संजीव वर्मा
Available at Ksagar Book Centre
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 02024453065
Reviews
There are no reviews yet.