Talathi Bharti Pariksha 36 Prashnapatrika TCS IBPS Pattern 2023
TCS IBPS Special
TCS आणि IBPS पॅटर्ननुसार तलाठी भरती
2019 च्या ऑनलाईन झालेल्या 36 प्रश्नपत्रिका उत्तर आणि स्पष्टीकरणासह विनायक घायाळ
मनोगत
विद्यार्थी मित्रांनो,
तलाठी भरती परीक्षेचे वेध आता आपणा सर्वांनाच लागले असून आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आता वेळ न दवडता तयारीस लागणे केव्हाही उत्तमच…!! कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासा-
साठी तीन बाबी महत्त्वाच्या ठरतात-
(१) पूर्वीच्या प्रश्नपत्रिका (२) दर्जेदार संदर्भ ग्रंथ
(३) योग्य मार्गदर्शन
-हे लाभल्यास आपले अथक प्रयत्न आपणास नक्कीच यशाच्या दिशेने घेऊन जातात; याबद्दल दुमत संभवत नाही.
आगामी तलाठी भरतीसाठी सन २०१९. मध्ये ऑनलाइन पद्धतीने झालेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका अभ्यासणे अत्यावश्यक ठरते; कारण त्याद्वारे आपल्याला विविध विषय घटकांचे, त्यावरील प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात याचे, सामान्य अध्ययन या घटकाची व्याप्ती आणि अंकगणित व बौद्धिक चाचणीवरील प्रश्नांचे स्वरूप लक्षात येण्यास मदत होते.
आणि त्यामुळे आपणास आपल्या उचित नियोजन करता येते. अशा प्रकारे आखलेला Perfect Plan आपणास अपेक्षित यशाकडे मार्गस्थ करतो; हे लक्षात घेऊन आगामी तलाठी भरतीसाठी यापूर्वी सन २०१९ मध्ये ऑनलाइन पद्धतीने झालेल्या ३६ प्रश्नपत्रिका या संदर्भाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या आहेत.
मात्र, असे करताना केवळ प्रश्नपत्रिका व प्रश्नांची उत्तरे न देता आगामी परीक्षेत
ज्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात असा आशय असणाच्या प्रश्नांचे विस्तृत विश्लेषण व स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्याच- बरोबर अंकगणित व बौद्धिक चाचणीवरील ट्रिकी प्रश्न सोडविण्याची सोपी पद्धत सविस्तर- पणे दिलेली आहे…
या पुस्तकाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे, कालबाह्य प्रश्नात तसेच काही वेळा कालबाह्य उत्तरांत कालसुसंगत बदल केला आहे. काही ठिकाणी अतिशय संदिग्ध प्रश्नाऐवजी त्याच धर्तीवरचा नवा अधिक उपयुक्त प्रश्न समाविष्ट केला आहे.
थोडक्यात, या पुस्तकाची उपयुक्तता वाढावी यासाठी शक्य तो प्रयत्न करण्यात आला आहे. या संदर्भ ग्रंथाची उपयुक्तता वाढविण्यात प्रकाशनातील कार्यरत सर्वांचा मोलाचा हातभार लागला आहे, हे येथे नमूद करणे माझे कर्तव्य आहे.
आणखी एक महत्त्वाचे म्हणजे, तलाठी भरती परीक्षेच्या अभ्यासक्रमातील सर्व घटकांच्या परीपूर्ण अभ्यासासाठी Vinayak Ghayal Study या You Tube चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा.
माझ्या अन्य संदर्भाप्रमाणे हेही पुस्तक आपणास अतिशय उपयुक्त ठरेल… आणि…. आपला यशोमार्ग प्रशस्त करण्यात
मोलाचा वाटा उचलेल… या सार्थ विश्वासासह, आगामी परीक्षेसाठी आपणास लक्ष लक्ष शुभेच्छा…!!
आपला मित्र,
विनायक घायाळ
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.