Talathi 43 Prashnapatrika TCS IBPS Pattern तलाठी 43 प्रश्नपत्रिका
Talathi 43 Prashnapatrika TCS IBPS Special तलाठी 43 प्रश्नपत्रिका
मनोगत…
विद्यार्थिमित्रांनो,
तलाठी भरतीची सुवर्णसंधी आता आपल्या अगदी समोर आहे. त्यामुळे आपले स्वप्न साकार करण्यासाठी, तलाठी भरती परीक्षेसाठी असणाऱ्या अभ्यासक्रमातील मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी आणि अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी या घटकांचा आतापासूनच सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे..
कोणत्याही परीक्षेसाठी पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणे महत्त्वाचे ठरते; कारण त्यामुळे आपल्याला आपल्या अभ्यासाची दिशा निश्चित करता येते. त्या अनुषंगाने आपण सन २०१९ च्या तलाठी भरतीसाठी ऑनलाइन झालेल्या ३६ प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणांसह हे पुस्तक प्रकाशित केले असून त्याची अलीकडेच दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली आहे.
विद्यार्थिमित्रांकडून आगामी परीक्षेसाठी TCS / IBPS धर्तीवरील सराव प्रश्नपत्रिकांची सातत्याने मागणी होत होती. तिचा विचार करून तलाठी भरती ४३ प्रश्नपत्रिका हा संदर्भ तयार केला आहे. तलाठी भरतीच्या २०१९ च्या ऑनलाइन प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला असता लक्षात येते की, पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांतील प्रश्नांच्या रोखानेच नवीन प्रश्न विचारण्यात आले आहेत. काही प्रश्नांची वारंवार पुनरावृत्तीही झालेली आहे. त्यामुळे अशा वारंवार विचारल्या गेलेल्या प्रश्नांच्या समावेशासह त्या अनुषंगाने विचारल्या जाऊ शकणाऱ्या संभाव्य प्रश्नांचाही या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. सन २०१९ मध्ये ऑनलाइन झालेल्या तीन प्रसपत्रिकांचादेखील सराव प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपात समावेश करण्यात आला आहे.
भारती ४३ या ताज्या संदर्भात देण्यात आलेल्या सराव प्रश्नपत्रिकांमध्ये सर्व अभ्यास घटकांना यथायोग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर आवश्यक तेथे स्पष्टीकरणेही दिलेली आहेत.
प्रकाशनाच्या इतर संदर्भाप्रमाणेच हाही संदर्भ आपले यश सुकर करण्यात मोलाची भूमिका बजावेल, या अपेक्षेसह हा संदर्भ आपल्या हाती सोपवीत आहे. आगामी परीक्षेसाठी आपणास मनःपूर्वक शुभेच्छा!!
आपला
विनायक घायाळ
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862
Reviews
There are no reviews yet.