Indian Polity M Laxmikanth Marathi K Sagar
आदरणीय एम लक्ष्मीकांत इंडियन पॉलिटी या विषयाचे राष्ट्रीय ख्यातीचे अभ्यासक व संशोधक. ‘इंडियन पॉलिटी’ हा त्यांच्या व्यासंगी लेखणीतून अन् लेखणीच्या व्यासंगातून साकारलेला आणि अल्पावधीतच देशाच्या कानाकोपऱ्यांत विद्यार्थीप्रिय झालेला ग्रंथ यातील ज्ञानवैभव आणि ते ज्ञानवैभव साध्या-सोप्या शब्दांत विद्यार्थिमित्रांपर्यंत पोहोचविण्याचे कौशल्य पाहून चक्क व्हा!
प्रस्तुतचा ग्रंथ हा उपरोक्त मूळ इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद. महाराष्ट्रीय विद्याथ्यांना मायबोलीच्या पदराखाली ज्ञानामृत चाखता यावं ही त्यामागची भावना ! एम लक्ष्मीकांत यांच्या मूळ इंग्रजी ग्रंथाचं मराठी भाषांतर करणं, त्यांनी जे इंग्रजीतून सांगितलं तेच
मराठीतून सांगणं आणि त्यांच्या ओघवत्या साध्या-सोप्या भाषेस पुरेपूर न्याय देणं, हे खरेतर, अतिशय अवघड श्रीकांत गोखले, माझे वर्गमित्र. मराठी व इंग्रजीवर सारखंच प्रभुत्व असणारं एक खरंखुरं स्कॉलर व्यक्तिमत्त्व त्यांनी ही जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली. त्याबद्दल ते निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत. लक्ष्मीकांत सर, श्रीकांत गोखले आणि मॅकग्रॉ हिल एज्युकेशन (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड या सर्वांनी
प्रस्तुतच्या मराठी अनुवादाच्या संपादन-संस्करणाची जबाबदारी आग्रहाने अस्मादिकांवर सोपविलेली. ही जबाबदारी पार पाडण्याचा यथामति प्रयत्न मी केला आहे. ही जबाबदारी पार पाडीत असतानाच विषयाच्या दृष्टीने महत्त्वाच्या व लक्षणीय स्वरूपाच्या मजकुरास स्क्रीन टाकून अधोरेखित करण्यात आले आहे. अनुवादित ग्रंथाचे संदर्भमूल्य व उपयोगिता त्यामुळे वाढावी, ही अपेक्षा.
क्यों हिल एज्युकेशन (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडच्या पदाधिकाज्यांनी के सागर पब्लिकेशनस्पति जी
आत्मीयता आणि आस्था दाखविली व के’सागर पब्लिकेशन्सला जो सर्वतोपरी सहयोग दिला, त्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करणे मी माझे कर्तव्य समजतो. प्रस्तुतचा संदर्भ हा मूळ इंग्रजी पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीचे भाषांतर असल्याने मूळ इंग्रजी पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीत नसलेल्या तदनंतरच्या कालावधीतील भारतीय राज्यघटनेशी निगडित घडामोडी स्वाभाविकच
या भाषांतरातही समाविष्ट नाहीत, हे येथे मी बुद्धया स्पष्ट करीत आहे.
केंद्र व राज्य लोकसेवा आयोगांचे विद्यार्थी, अध्यापक-प्राध्यापक व अभ्यासू-जिज्ञासू अशा सर्वांनाच हा ग्रंथ मार्गदर्शक ठरावा हीच मनीषा!
आपला,
व्ही. एस. क्षीरसागर
(K’Sagar)
Available at Ksagar Book Centre or onwww. ksagaronline.com or call on 9545567862 / 20224453065
Reviews
There are no reviews yet.