Ksagar Sampoorna Gramsevak संपूर्ण ग्रामसेवक
संपूर्ण ग्रामसेवक 26वी आवृत्ती के सागर जिल्हा निवड समितांकडून
ग्रामसेवक पदाकरिता घेतल्या जाणाऱ्या परीक्षांकरिता अत्यंत उपयुक्त आणि परिपूर्ण संदर्भ (गाईड)
के’सागरीय…
नजीकच्या भविष्यकाळात जिल्हा परिषदांतर्गत ‘ग्रामसेवक’ पदाच्या रिक्त पदांवर भरती करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांना त्यासाठी १८० गुणांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची परीक्षा द्यावी लागणे अपेक्षित आहे. मुलाखतीसाठी २० गुणांची योजना राहील असेही अनुमानित आहे.
या परीक्षेचा एकूण अभ्यासक्रम अतिशय व्यापक स्वरूपाचा आहे. त्यामुळे संपूर्ण अभ्यास- क्रमाचा यथायोग्य परामर्श घेणाऱ्या दर्जेदार व उपयुक्त पुस्तकाची रचना साकारावयाची तर त्यासाठी पुरेसा काळ खर्ची पडणे अपरिहार्य होते.
या पार्श्वभूमीवर साहजिकच या पुस्तकाची पहिली आवृत्ती साकारण्यास काहीसा विलंब झाला होता. आता या पुस्तकाची ही सुधारित (नवीन अभ्यासक्रमानुसार) सव्विसावी आवृत्ती विद्यार्थ्यांच्या हाती देण्यासही थोडासा विलंबच होत आहे. खरे तर, दरम्यानचा कालावधी या पुस्तकाचा दर्जा आणि उपयुक्तता वाढविण्यासाठीच खर्ची पडला आहे. यातून विद्यार्थ्यांना अल्पकाळात या परीक्षेची तयारी करता यावी, अशा प्रकारे पुस्तकाची रचना आकारास आली आहे. याचे अर्थातच, मला समाधान वाटते. त्याबरोबरच ‘व्यावसायिक गणित’ हा विषय माझ्या अभ्यासक्रमात नसल्याने हे गणित चुकल्याची खंतही मला वाटत नाही.
प्रस्तुतचा संदर्भ माझ्या विद्यार्थिमित्रांना त्यांच्या परीक्षेत भरपूर गुण मिळवून देण्यास उपयुक्त ठरल्यास त्यापरते यश ते कोणते ? हेच यश मला मोलाचे वाटते.
हार्दिक शुभेच्छांसह!
आपलाच, व्ही. एस. क्षीरसागर (K’Sagar)
Available at Ksagar Book Centre
www. ksagaronline.com or call on 9545567862 /20224453065
Reviews
There are no reviews yet.