Bee TET – Shikshak Patrata Pariksha Paper 1 & 2 2013 TE 2019 Prashnapatrika Vishleshan
शिक्षक मित्रहो..
आजच्या काळात सामाजिक व आर्थिक विकासाचे साधन म्हणून णाकडे पाहिले जाते व हे मिश्रण बालकामध्ये रूजविण्याचे महान कार्य शिक्षकांना करावे लागते, परंतु बदललेल्या शैक्षणिक धोरणानुसार २१ व्या शतकातील शिक्षक हा सर्वगुण संपन्न, समाजळीत, कृतिशीत असणे अत्यंत गरजेचे आहे. ही जाणीव शासनस्तरावरी ठेवून बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ नुसार महाराष्ट्र सरकाने २०१४ पासून महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा (TET) घेण्यास सुरुवात केली.
शिक्षक होवून भावी पीढ़ी घडविण्याचे महान व्रत उराशी बाळगणाऱ्या सर्वच इ.१ ली ते ८ वी पर्यंतच्या भावी शिक्षक बंधु-भगिणींना ही शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केल्यामुळे नकळतपणे शिक्षक होण्याच्या आपल्या स्वप्नांमध्ये योडासा जडपळा निर्माण झाला. परंतु हा अडथळा दूर व्हावा व आपली स्वप्नपूर्ती व्हावी, या आशेने सुरुवातीला पोडक्यात परीक्षेच्या पद्धतीचा आराखडा देवून मी व माझ्या सहकाऱ्यांनी आपल्यासाठी आतापर्यंत झालेल्या TET च्या सर्व प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करण्याचे कार्य हाती घेतले अन् ते आज खऱ्या अयनि पूर्णत्वास आले. आज या पुस्तकाची दुसरी जावृत्ती आपल्या हाती देत असताना अत्यानंद होत आहे. पहिल्या आवृत्तीस ने प्रेम दिलेत तसेच या दुसन्या आवृत्तीस सुध्दा द्याल व हे पुस्तक आपल्याला यशाचा राजमार्ग नक्कीच
दाखवेत असा मला विश्वास आहे. ‘शिक्षक पात्रता परीक्षा, प्रश्नपत्रिका विश्लेषण व वर्गीकरण’
पुस्तक आपल्या हाती देत असताना अत्यानंद होत आहे. कारण ज्या लहान बालकांकडे या देशाचे भक्कम आधारस्तम म्हणून पाहिले जाते तो आधारस्तंभ आपण सर्वजणांनी मजबूत करण्याचे महान व्रत हाती घेतले आहे व हे हात बळकट करण्याचा एक छोटासा प्रयत्न मी व माझ्या सहकाऱ्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे. शिक्षणाचे महत्व सांगताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, उपासमारीने शरीराचे पोषण कमी झाल्यास माणूस बलहीन होऊन अल्पायुषी होतो, तसेच शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास तो जीवंतपणी दुसऱ्याचा गुलाम बनतो’ म्हणून आपण उराशी बाळगलेलं शिक्षक होवून मुलांना सक्षम बनविण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..!
सदर पुस्तक पूर्णत्वास नेण्यासाठी माझे आई-वडील तसेच ज्यांनी ज्यांनी मला प्रोत्साहित केले अशा सर्वांचा मी ऋणी राहील. तसेच पुस्तक दर्जेदार होण्यासाठी परशुराम जाधव सर, रेश्मा सुरूलकर मॅडम, दत्तात्रय जगताप सर. प्रसाद सपाटे सर यांनी महत्वाची भूमिका बजावली त्याबदल त्यांचेही आभार मानतो. तसेच सदर पुस्तकाला मूर्त स्वरूप प्राप्त करून देणारे प्रदिप माने व सोनाली लांवघरे यांनी शब्दांची जुळवणी व मांडणी तसेच सोनाली लांवघरे यांनी देखणे मुखपृष्ठ केले व ‘बी पब्लिकेशन’चे संपादक अजितकुमार सर यांनी सदर पुस्तक छापील स्वरूपातः आपल्या सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी मोलाचा वाटा उचलला आहे. त्याबद्दल मी या सर्वांचा ऋणी आहे..
प्रा. श्री, कृष्णा शंकर रोकडे
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065
Reviews
There are no reviews yet.