Gurukul Prabodhini – Dept.PSI Kayde ( IPC, CrPC Evidence ,19 Minor Acts & Human Rights )
BAL NYAY ADHINIYAM 2015
या आवृत्तीच्या निमित्ताने…
Dept. PSI च्या कायदे नोट्स आणि ऑनलाइन-ऑफलाईन बॅचच्या माध्यमातून आजवर हजारोंच्या संख्येने यशस्वी झालेल्या माझ्या सर्व फौजदार मित्रांचे हार्दिक अभिनंदन…
2022 च्या परीक्षेपासून MPSC ने कायदा घटकावरील बहुतांशी प्रश्न व्यापक दृष्टिकोनातून संकल्पनावर आधारित विचारण्यास सुरुवात केलेली आहे. या सर्व बाबी डोळ्यासमोर ठेवून हे सर्वसमावेशक पुस्तक तयार केलेले आहे. कायदा हा विषय समजण्यास अवघड असला तरी, स्पर्धा परीक्षांमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा हा एकमेव विषय आहे.
हे पुस्तक आपल्या ऑफलाईन आणि ऑनलाईन क्लासेसच्या बॅचेससाठी पूरक म्हणून संक्षिप्त स्वरूपात, तंतोतंत आणि परीक्षाभिमुख बनवण्यात आलेले आहे. पोलीस बांधवांना ‘कायदा’ या घटकात पैकीच्या पैकी गुण मिळण्यासाठी तसेच कायदा घटकातील सर्व संकल्पना व इतर वस्तुनिष्ठ माहिती आपल्या ऑफलाईन आणि ऑनलाईन क्लासमध्ये विस्तृतपणे समजून सांगितली जाते.
बहुसंख्य पोलीस बांधवांनी मला प्रत्यक्ष भेटून किंवा फोनद्वारे असा अभिप्राय कळवला की, “संपूर्ण महाराष्ट्र पोलीस आपल्या क्लासच्या नोट्स वाचतोय.” पोलीस बांधवांनी आपल्या ऑनलाईन बॅचला आणि नोट्सला दिलेल्या प्रचंड प्रतिसादामुळेच या पुस्तकाच्या निर्मितीस प्रेरणा मिळाली.
आजवर आपल्या MPSC च्या सर्व ऑफलाइन ऑनलाईन बॅचेसला विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
(उदा. PSI कायदे, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था, राज्यसेवा (संयुक्त) इंटिग्रेटेड बॅचेस इ.) माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल मी आपणा सर्वांचा ऋणी आहे.
आपल्या वाटचालीत मी या पुस्तक रूपाने आपल्यासोबत आहे, याचा मला सार्थ अभिमान वाटतो.
आगामी परीक्षेसाठी तुम्हाला खूप-खूप शुभेच्छा!
आपला, ज्ञानेश्वर रामचंद्र पाटील
Dnyaneshwar Patil
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.