Vidyabhartee Police Bharti विद्याभारती पोलिस भरती
मनोगत
‘विद्याभारती पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक’ हे पुस्तक आपल्या हाती देताना मा आनंद होत आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून ‘पोलीस’ बनण्याचे स्वप्न उराशी बाळगाय प्रत्येक उमेदवारास उपयुक्त मार्गदर्शन निश्चित होईल.
महाराष्ट्र पोलीस दल व राज्य राखीव पोलीस दलात पुरूष व महिला उमेदवारांची पोलीस शिपाई
(कॉन्स्टेबल) पदासाठी वेळोवेळी आवश्यकतेनुसार भरती करण्यात येते. सध्या महाराष्ट्र शासनाच्या
धोरणानुसार महाराष्ट्र पोलीस दलात दरवर्षी हजारो पोलीस शिपायांची भरती करण्यात येणार आहे. पोलीस दलात निवड व्हावी अशा अपेक्षेने शहरासोबत ग्रामीण भागातील बहुसंख्य युवक भरतीच्या ठिकाणी जातात परंतु उपयुक्त मार्गदर्शनाच्या अभावी त्यांच्या पदरी निराशा येते. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन या पुस्तकात पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा व मुलाखत चाचणी याची सर्वांगीण तयारी उमेदवारानी कशी करावी याचे यथोचित मार्गदर्शन करण्यात आले आहे.
या पुस्तकात पोलीस भरती प्रक्रिया, महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन, मराठी व्याकरण, सामान्यज्ञान
(जनरल नॉलेज), अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी व चालू घडामोडी आणि महत्त्वाच्या व्यक्ती असे विभाग
केलेले आहेत. प्रत्येक विभागामध्ये उमेदवाराची परिपूर्ण तयारी होईल अशी माहिती विस्ताराने दिली आहे.
विद्याभारती प्रकाशनाचे उत्साही प्रकाशक श्री. रवि जोशी यांनी अल्पावधितच आपल्यापर्यंत हे पुस्तक पोहोचवल्याबद्दल आणि अक्षरजुळवणीसाठी अमृत थोरात यांनी सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
पुस्तकातील उणीवासंबंधी व पुस्तकाची उपयुक्तता वाढविण्यासाठी आपल्या सूचना व अभिप्राय स्वागतार्ह आहेत. आपल्या सूचनांचा पुढील आवृत्तीत अवश्य विचार केला जाईल. पोलीस भरती मध्ये यश मिळवण्यासाठी प्रत्येक उमेदवारास हार्दिक शुभेच्छा !
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 954556786 /02024453065
Reviews
There are no reviews yet.