The Alchemist (Marathi) (द अल्केमिस्ट (मराठी)
द अल्केमिस्ट पुस्तकाच्या ८.५ करोड प्रतींची विक्री
अन्डालुसिया इथल्या सॅन्टिआगो नावाच्या एका मेंढपाळाची ही कथा आहे. स्पेनमधल्या त्याच्या जन्मभूमीपासून इजिप्तच्या वाळवंटापर्यंतचा त्यांचा हा प्रवास आपल्या मनाचा तळ ढवळून काढतो. कथेतील साधेपणामुळे आपल्या मनाचा वेध घेतो. पिरॅमिड्सजवळ लपवलेल्या खजिन्याच्या शोधात निघालेल्या सॅन्टिआगोला प्रवासात एक जिप्सी स्त्री, स्वतःला राजा म्हणवून घेणारा वयोवृद्ध आणि एक किमयागार भेटतो. प्रत्येकजण या तरुणाला योग्य दिशा दाखवतो. तथापि, खजिना नेमका काय आहे हे कोणालाच माहीत नसतं. वाटेत येणाऱ्या अडथळ्यांवर तरुण यशस्वीपणे मात करू शकेल का हेसुद्धा कोणाला सांगता येत नाही. भौतिक वस्तूंच्या शोधार्थ निघालेल्या सेन्टिआगोला स्वतःच्या अंतरंगात दडलेल्या खजिन्याचा शोध लागतो. मानवतेच्या गाभ्याला स्पर्श करणारी अशी ही उत्कट आणि प्रेरक कथा, ‘आतला आवाज ऐकणं महत्त्वाचं का आहे आणि जीवनाला संपूर्ण कलाटणी देण्याचं सामर्थ्य स्वप्नांमध्ये कसं आहे. याचा शाश्वत आलेख म्हणजे सॅन्टिआगोची ही कथा.
‘पाउलो कोएलोच्या पुस्तकांनी लाखो वाचकांच्या मनांवर प्रभाव टाकला आहे. ‘
– द टाइम्स
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.