Shivcharitra Ani Vicharpravah Dr.Shrimant Kokate शिवचरित्र आणि विचारप्रवाह डॉ.श्रीमंत कोकाटे
शिवाजीराजे धार्मिक होते, पण धर्मांध नव्हते. ते श्रद्धाळू होते, परंतु अंधश्रद्धाळू नव्हते. ते स्वाभिमानी होते, परंतु अहंकारी नव्हते. त्यांना आपल्या वैभवशाली परंपरेचा अभिमान होता. परंतु अनिष्ट परंपरेचा त्यांनी कधीही अनुनय केला नाही. ते प्रागतिक विचारांचे होते, ते शूर-पराक्रमी होते, तितकेच ते कनवाळूही होते. त्यांच्या राज्यात धार्मिक स्वातंत्र्य होते, परंतु त्यांनी कोणाचीही धर्मांधता खपवून घेतली नाही. ते जितके चाणाक्ष, मुत्सद्दी, मुरब्बी, अष्टावधानी होते तितकेच ते अत्यंत नीतिमान होते.
शिवाजीराजांचा लढा प्रामुख्याने तीन कारणांसाठी होता. भूमिपुत्रांच्या राजकीय स्वातंत्र्यासाठी ते मोगल-आदिलशहा विरुद्ध लढले. स्थानिक अन्याय-अत्याचाराविरुद्ध ते वतनदार सरंजामदारांविरुद्ध लढले, तर धार्मिक स्वातंत्र्यासाठी ते सनातन्यांविरुद्ध लढले.
छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास अनेक विचारप्रवाहांना प्रभावित करतो, त्यामुळे अनेक विचारप्रवाहांनी शिवचरित्र लेखन केलेले आहे. प्रस्तुत ग्रंथात शिवरायांच्या भोसले कुळाचे मूळ, शिवरायांची प्रेरणा, शिवरायांचे धार्मिक धोरण, शिवरायांचे जातीविषयक धोरण, शिवरायांचे स्त्रीविषयक धोरण आणि शिवरायांचे शेतीविषयक धोरण, याबाबत विस्ताराने चिकित्सा केलेली आहे. हा ग्रंथ म्हणजे प्रमुख शिवचरित्र लेखनातील विविध विचारप्रवाहांचा चिकित्सक अभ्यास आहे.
डॉ. श्रीमंत कोकाटे
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 02024453065
Reviews
There are no reviews yet.