Shetkaryacha Asud शेतकऱ्याचा असूड
लेखक : महात्मा ज्योतिबा फुले
संपादक : गंगाधर बनबरे
‘शेतकऱ्याचा असूड
महात्मा फुले हे तुकोबांचा विचार चालवणारे वारकरीच होते, यात संदेह नाही. शेतकऱ्याचा कळवळा दोघांनाही आहे. तुकोबा शेतकरी होते, कुणबी असल्याचा त्यांना अभिमान होता. फुल्यांनीही मांजरी या गावी दोनशे एकर शेती घेऊन स्वतः कसली होती. शेतकऱ्या पुढे एक आदर्श ठेवला होता. तुकोबांनी शेतकऱ्याची कर्जखते बुडवून आपल्या सामाजिक संघर्षाची सुरुवात केली होती. तर फुल्यांनी प्रथम शेतकऱ्यांचा कैवार घेवून आंदोलन केले. संपूर्ण आयुष्यच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी घालविले. ज्या काळी ब्राह्मण लेखक चक्चाल साहित्य निर्माण करीत होते त्याकाळात शेतकऱ्यांची वेदना फुले मांडत होते. शेतकरी हा विषय साहित्याचा करून नवे परिमाण मिळवून देण्यात फुल्यांचा मोठा वाटा आहे. बळीराजाचा घेतलेला कैवार किती सार्थ होता याची प्रचिती तुकोबाचे अभंग वाचल्यावर यावी, वामन हा कपटी बामण आहे हे संशोधन मांडून फुल्यांनी त्याच्यावर प्रहार केला परंतु तुकोबा अवतार कल्पनेतून विचार करतानाही वामनाची बाजू घेत नाहीत तर बळीराजाची बाजू घेतात. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. डॉ. आ. ह. साळुंखे यांनी ‘बळीवंश’ मध्ये तुकोबांची ही बळी प्रेरणा साधार दाखवून दिली आहे. शेतकऱ्यांचे म्हणजेच बळीचे राज्य पुन्हा निर्माण करण्याची प्रेरणा तुकोबांनी शिवाजी राजांना दिली हा इतिहास आपणासमोर आहेच. त्याचा गौरवपूर्ण उल्लेख फुल्यांनी केलाच आहे. एवढेच नाही तर कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी राजांचा पोवाडा लिहून आपली बळीनिष्ठा, शिवनिष्ठा, व्यक्त केली आहे.
Also Available On
Ksagar Online.Com
UPSC Preparation Books from Marathi Literature ,Main Exam .( Optional ) Available at Ksagar Book Centre or on ksagaronline.com or call on 9545567862
Reviews
There are no reviews yet.