The Disciplined Trader (Marathi)
आपल्या ट्रेडिंगविषयीच्या वर्तनाचं परीक्षण कसं करावं आणि त्याला मर्यादा कशा घालाव्यात हे मार्क डग्लस सर्वसमावेशक आणि तर्कशुद्ध पद्धतीनं दाखवून देतात. आठवड्यांमागून आठवडे, महिन्यांमागून महिने आणि वर्षांमागून वर्षं असे सातत्यानं पैसे मिळवत राहिलेल्या शेअर बाजारातील अल्पसंख्य विजेत्यांकडे असलेली मानसिक शिस्त आपल्या मनात कशी विकसित करावी तेही ते सांगतात.
‘द डिसिप्लिन्ड ट्रेडर मध्ये काही विशिष्ट कौशल्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी आवश्यक असलेल्या सकारात्मक प्रेरणाशक्ती शिकणं, ट्रेडर म्हणून प्रगती करून घेण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्यं ओळखणं (आणि फक्त त्यांचं उपउत्पादन असलेल्या पैशाविषयी जागरूक राहण्याऐवजी मुळातच या कौशल्यांविषयी कसं जागरूक राहावं ते शिकणं), बाजारातील मूलभूत बदलांना प्रतिसाद देण्यासाठी स्वतःची तयारी करणं, तुमची ‘रिस्क कम्फर्ट लेव्हल’ (किती प्रमाणात जोखीम घेणं तुम्हाला सहजपणे झेपणार आहे त्याचं प्रमाण) ओळखणं आणि तिचा विस्तार करण्यास शिकणं, संधीचा तत्काळ लाभ घेणं, कोणती गोष्ट किती प्रमाणात पुरेशी आहे ते बाजारालाच सांगायला लावणं, बाजाराच्या हालचालींविषयीच्या तुमच्या दृष्टिकोनावर नियंत्रण ठेवणं इत्यादी, अनेक कौशल्यांचा त्यांच्यामध्ये समावेश आहे.
Reviews
There are no reviews yet.