Sakshi (साक्षी ) by Dr.S L Bhyrappa
अनुवादित कादंबरी
डॉ. एस. एल. भैरप्पा यांची ही १९८६ सालची कादंबरी. प्रत्येक लेखक आपली कलाकृती ‘साक्षी’ भावानंच लिहीत असतो, नव्हे, तेच अपेक्षित असते. तरीही काही प्रश्नांकडे इतक्या अलिप्तपणे पाहणं जमतंच असं नाही.
धर्म, अर्थ आणि काम या मार्गानं मोक्षापर्यंत जाता येईल, पण यातील कशाचाही अतिरेक झाला तर ? व्यक्तिगत पातळीवरच नव्हे,
कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवरील जीवनही डहुळून जाते. खोटं बोलण्यामुळे आत्महत्या केलेल्या परमेश्वरय्याचा सूक्ष्मदेह
यमधर्माच्या परवानगीने पुन्हा भूतलावर येऊन सत्याचा शोध घेऊ पाहतो.
जीवनाचं वास्तव पाहता पाहता
अखेरीस त्याच्यासमोर प्रश्न उभा राहतो, ‘असत्याचं मूळ कोणतं? त्याला अंतच नाही का?’ यमलोक, यमधर्म, चित्रगुप्त यांच्यासमोर निवाड्यासाठी ठाकलेली कथा
परमेश्वरय्या नागप्पा – मंजय्याची तर आहेच; तशीच यांच्या सान्निध्यामुळे ग्रासलेल्या सावित्री – सत्यप्पा आणि रामकृष्णाचीही आहे. बघता बघता ती वाचकांनाही घेरून टाकते…..
एस.एल.भैरप्पा
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.