Mor Odisha Diary Rajesh Patil ( मोर ओडिशा डायरी ) राजेश पाटील
ही डायरी आहे एका तरुण आयएएस अधिकाऱ्याची. ओडिशासारख्या आव्हानात्मक राज्यात त्याने केलेल्या कामांची. प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत एक तरुण आयएएस होतो. ओडिशासारख्या पूर्ण अनोळखी, मागास मानल्या जाणाऱ्या राज्यात काम सुरू करतो. अधिकारी म्हणून तो तिथे कसा घडत जातो, तिथल्या आदिवासीबहुल-नक्षलग्रस्त भागांत काम करताना त्याला कोणते अनुभव येतात, रोज समोर येणारी आव्हानं तो कशी पेलतो, याची गोष्ट म्हणजे मोर ओडिशा डायरी. ही डायरी जशी एका अधिकाऱ्याच्या प्रवासाचा, त्याच्या कर्तृत्वाचा आलेख मांडते, तसंच एक प्रामाणिक अधिकारी ठरवलं तर केवढं काम करू शकतो याचाही दाखला देते. सनदी अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी हे मनोगत नक्कीच उपयुक्त आणि प्रेरणादायी ठरेल.
समकालीन प्रकाशन
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.