Kutuhalapoti Anil Awachat ( कुतूहलापोटी – अनिल अवचट )
अनिल अवचट लिखित ‘कुतूहलापोटी’ या पुस्तकाचा पुस्तकाचा थोडक्यात परिचय
फेवरेट लेखकाचं फेवरेट पुस्तकं….
आपल्या सभोवतालच्या प्रत्येक सजीवात किती आश्चर्यं दडलेली आहेत! पक्ष्यांच्या मऊसूत हलक्या पिसांमध्ये मैलोनमैल उडण्याची ताकद कुठून येते? मधमाशा मकरंदावर अशी कोणती प्रक्रिया करतात, ज्यातून हजारो वर्षं टिकू शकणारा मध तयार होतो?
कुण्या एका कीटकाची अंडी वीस-वीस वर्षं सुप्तावस्थेत कशी काय राहू शकतात? माणसाला अजूनही न जमलेलं सेल्युलोजचं विघटन बुरशी कसं करते? आश्चर्यंच आश्चर्यं! आपल्या शरीराचंही तेच. मेंदूपासून हृदयापर्यंतच्या लाखो गुंतागुंतीच्या यंत्रणा सुरळीत कशा चालतात, हे एक कोडंच.
या आणि अशा प्रश्नांची कोडी अनिल अवचटांना पडली आणि लागले की ते त्यांच्या मागे. तज्ज्ञ गाठले, पुस्तकं पालथी घातली आणि ही कोडी सहजसोप्या भाषेत उलगडून आपल्यासमोर ठेवली. सजीवांच्या जीवनक्रियांविषयी कुतूहलापोटी घेतलेला हा शोध वाचाल, तर थक्क व्हाल गुरू
समकालीन प्रकाशन
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.