The Story of Philosophy Marathi ( Paschimatya Tatvadyanachi Kahani ) Will Durant
तत्त्वज्ञानात एक प्रकारचे सुख आहे. अध्यात्माच्या मृगजळातही एक प्रकारची मोहिनी आहे. एक प्रकारचे आकर्षण आहे. तत्त्वज्ञानाच्या प्रत्येक विद्यार्थ्याला या गोष्टीचा अनुभव येतो; परंतु शेवटी विचाराच्या अत्युच्च शिखरावरून मनुष्य रोजच्या रामरगाड्यात येतो. विद्यार्थिदशा संपूर्ण संसारात चालू राहते. या भौतिक जीवनाच्या शेकडो गरजा तत्त्वजिज्ञासूला खाली खेचतात. प्रत्येकाच्या जीवनात एकेकदा वसंत ऋतू येऊन जातो. त्या वेळेस आपणास तत्त्वज्ञान प्रिय वाटत असते. तत्त्वज्ञान म्हणजे ‘प्रियतम आनंद’ असे प्लेटो म्हणे. आपणा सर्वांच्या अनुभवाला ही गोष्ट जीवनाच्या वसंत ऋतूत येते. त्या वेळेस ज्या वेळेस जीवनात सोनेरी सूर्यप्रकाश सर्वत्र पसरलेला असतो. या विनयशील चकविणाऱ्या सत्याच्या मागोमाग जाण्यात आपणास कृतार्थ वाटत असते. या देहाच्या सुखोपभोगांपेक्षा, या तुच्छ सांसारिक जीवनात गढून जाण्यापेक्षा हाती न सापडणारे, आपणास हुलकावणी दाखवणारे सत्याचे, तत्त्वज्ञानाचे जे मोहक रूप, त्यापाठीमागे जाण्यात आपणास पुरुषार्थ वाटतो आणि ती वासंतिक वेळ जरी निघून गेली; संसाराच्या फेऱ्यात जरी आपण गुरफटलो, तरीही आधीची प्रज्ञानाचा अनुनय करणारी जी भूक, जी ती उत्कट इच्छा, तिच्या उत्कंठेचा काहीतरी अंश सदैव शिल्लक असतोच. ज्ञानाला वरण्याची आपली इच्छा काही सर्वस्वी मरत नाही.
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862/02024453065
Reviews
There are no reviews yet.