तनामनाच्या हाका संवेदनशीलपणे स्वीकारून स्त्रियांच्या हक्कासाठी समर्थपणे लढणाऱ्या आतल्या आवाजाला ही कादंबरी समर्पित आहे. ही कादंबरी, समाजातील एका महत्त्वपूर्ण परंतु दुर्लक्षित विषयावर तटस्थपणे प्रकाश टाकणारे धगधगते वास्तव आहे. आपल्याच आजूबा
जूला असलेल्या लेस्बिअन्सच्या जीवनातील अंतर्बाह्य संघर्ष, त्यांच्याविषयीच्या समाजाच्या वाईट प्रतिक्रिया, त्यांची समाजस्वीकृती आणि आत्मसन्मान यावर आधारित असणारी ही कादंबरी समलिंगी स्त्रियांच्या जीवनातील कटू पण वास्तव अनुभव आपल्यासमोर टोकदारपणे मांडते. तसेच वाचकाला अंतर्मुख करते. विचार करायला भाग पाडते. प्रसंगी हळवेही करते.
आधुनिक जगातही समलैंगिकतेबद्दल अनेक गैरसमज आणि पूर्वग्रह असलेले दिसून येतात. समलिंगी स्त्रिया आपल्या अस्तित्व आणि स्वओळखीसाठी नेहमीच एक निरंतर संघर्ष करत असतात. अशा या स्त्रियांच्या जीवनाचा, त्यांच्या मनोव्यथांचा आणि आनंदाच्या क्षणांचा नेमका आणि प्रामाणिक परखड आलेख शुभांगी दळवी यांनी ‘द लेस्बिअन’ या कादंबरीत धाडसाने मांडला आहे.
Reviews
There are no reviews yet.