The Art Of Focus Marathi द आर्ट ऑफ फोकस Gauranga Das
डिजिटल युगामध्ये तंत्रज्ञान फारच व्यापक झालं आहे. हे पुस्तक वाचकांना एकाग्रता व डिजिटल जीवनामध्ये स्वनियंत्रण मिळवण्यासाठी दिशा देईल. – आर्थी सुब्रमनियम टाटा सन्सचे समूह प्रमुख डिजिटल ऑफिसर. ‘द आर्ट ऑफ फोकस’ हे पुस्तक आपल्याला अंतरंगाच्या प्रवासाला घेऊन जाते. आपल्याला जीवनाचा खरा अर्थ समजायला मदत करते. जेव्हा एखादी व्यक्ती हा अर्थ अंतरंगातून जाणून घेते तेव्हाच ती बाह्य जगामध्ये परिवर्तन आणू शकते. – आदित्य नटराज, पिरामल फाऊंडेशनचे सीईओ – ‘द आर्ट ऑफ फोकस’ हे पुस्तक फक्त आपल्याला मानसिक स्वास्थाविषयी प्रशिक्षितच करत नाही तर त्याही पलीकडे जाऊन आपल्याला आध्यात्मिक स्वास्थ्यावर एकाग्रता करण्यासाठी प्रेरितही करते. – संगीता रेड्डी, अपोलो हॉस्पिटल ग्रुपच्या सह व्यवस्थापकीय संचालक – ‘द आर्ट ऑफ फोकस’ हे पुस्तक तीन पुस्तकांच्या मालिकेतील दुसरं पुस्तक आहे. अतिशय प्रभावी अशा ४५ कथांच्या माध्यमातून वाचकांना त्यांच्या जीवनामध्ये उपयोगी पडतील असे मानवी गुण यामधून व्यक्त केले आहेत. याच मालिकेतील पहिलं पुस्तक ‘आर्ट ऑफ रेझिलियन्स’ म्हणजेच लवचीकता. या पुस्तकाने कोव्हीड १९ च्या काळात निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये लोकांना लवचीकतेच्या आधारे मार्ग काढण्यासाठी प्रेरित केलं. ‘द आर्ट ऑफ फोकस’ हे पुस्तकही एकाग्रतेच्या माध्यमातून मनाला एक नवी उभारी देते. हे पुस्तक लोकांना त्यांच्या जीवनातील जबाबदाऱ्या पार पाडण्यास व आयुष्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नक्कीच मदत करेल.
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862/02024453065
Reviews
There are no reviews yet.