Shodh Neharucha Ani Bhartachahi ( शोध नेहरूंचा आणि भारताचाही )
₹200.00 Original price was: ₹200.00.₹160.00Current price is: ₹160.00.
Shodh Neharucha Ani Bhartachahi ( शोध नेहरूंचा आणि भारताचाही )
Author : Shashi Tharur
Translator : Manohar Sonawane
Language : Marathi
Publisher : Samakalin Prakashan समकालीन प्रकाशन
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Shodh Neharucha Ani Bhartachahi ( शोध नेहरूंचा आणि भारताचाही )
– शशी थरुर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची पहिली सतरा वर्ष जगाच्या दृष्टीने पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू हे भारताचा चेहरा होते. खरं तर नेहरू म्हणजेच भारत असं चित्र होतं.
नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वात अनेक विरोधाभास सामावलेले होते. श्रीमंत आणि प्रतिष्ठित घरात जन्मलेले ते एक लहरी तरुण होते, पण त्याच वेळी ते समाजवादी विचारांनी भारलेले होते आणि गोरगरीब शेतकरी जनतेविषयी त्यांना काहीशी गूढ म्हणावी अशी कळकळ होती. इंग्लंडमधल्या हॅरो व केंब्रिजच्या वातावरणात शिक्षण घेऊन आंग्लाळलेल्या या तरुणाने पुढे दहा वर्षांहून अधिक काळ इंग्रजांचा तुरुंगवास भोगला. ते स्वतः निरीश्वरवादी बंडखोर होते, पण तरीही संतवृत्तीच्या महात्मा गांधींचे ते पट्टशिष्य बनले. महात्मा गांधींच्या हत्येनंतर तेच राष्ट्राच्या मशालीचे रक्षणकर्ते बनले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा ते सर्वांत दृग्गोचर चेहरा होते. अत्यंत प्रामाणिक, द्रष्टा, सर्वसमावेशक, राजकारणापलीकडचा राजकारणी असं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं. हे व्यक्तिमत्त्व इतकं प्रभावी होतं की त्यांच्याशिवाय देशाची कल्पना करणं अशक्य होतं. त्यांच्या मृत्यूच्या एक वर्ष आधी वेलेस हँगन या आघाडीच्या अमेरिकी पत्रकाराने ‘आफ्टर नेहरू, हू?’ हे पुस्तक प्रकाशित केलं होतं. त्यातून नेहरूंचा उत्तराधिकारी कोण, या चिंतेपलीकडचे काही मुद्दे प्रतिबिंबित होत होते. जगात सर्वत्र जणू एक मूकप्रश्न होता, ‘आफ्टर नेहरू, व्हॉट?’ (नेहरूंनंतर भारताचं काय होणार ?)
आज त्यांच्या मृत्युपश्चात चार दशकांनंतर या मूकप्रश्नाचं थोडंफार उत्तर आपल्याकडे आहे. एकविसाव्या शतकात पाऊल टाकताना भारतात अजूनही नेहरूवादाचा प्रभाव भासत असला तरी जवाहरलाल नेहरूंचा फारच थोडा वारसा शाबूत असल्याचं दिसत आहे. नेहरूंच्या विचारसरणीपासून भारताने बरीच फारकत घेतली आहे आणि कधी काळी या नेहरूवादाच्या प्रभावाखाली असणारं उर्वरित विकसनशील जगही वेगवेगळ्या मार्गांनी त्यापासून दूर गेलं आहे. स्वातंत्र्य मिळून साठ वर्षं उलटून गेल्यावर भारतात मोठं परिवर्तन घडत आहे, ज्याने वसाहतोत्तर राष्ट्रीयत्वाबद्दलची मूलभूत नेहरूवादी गृहीतकं बदलून टाकली आहेत.
एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर उभं राहून विसाव्या शतकातल्या या महान राष्ट्रवादी नेत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न मी या संक्षिप्त चरित्रातून केला आहे. जवाहलाल नेहरूंचं चरित्र ही एक रोमहर्षक कहाणी आहे आणि तिला न्याय देण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला आहे. निर्विवाद पंतप्रधान आणि अतुलनीय जागतिक नेता असणाऱ्या जवाहरलाल नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वातून त्यांचं ऐषोरामी बालपण, विशेष लक्षणीय नसलेली विद्यार्थिदशा, तरुणपणातला लक्षवेधी राष्ट्रवाद आणि स्वातंत्र्यलढ्याचं लढवय्यं नेतृत्व या गोष्टी वेगळ्या करता येऊ शकत नाहीत. या जीवनप्रवासाबरोबरच समारोपाच्या प्रकरणात नेहरूंनी आपल्या देशाला वारसा म्हणून दिलेल्या प्रमुख स्तंभांचं मी समीक्षात्मक विश्लेषण केलं आहे. लोकशाही संस्थानिर्मिती, देशव्यापी कडवा धर्मनिरपेक्षतावाद, समाजवादी अर्थशास्त्र आणि अलिप्ततावादी परराष्ट्र धोरण हे ते चार स्तंभ आहेत. त्या सर्वांमध्ये भारतीयत्वाची अंगभूत दृष्टी होती, जिला आज मूलभूत आव्हान दिलं गेलं आहे.
हे पुस्तक विद्वत्तापूर्ण नाही. तसंच कोणत्याही नव्या संशोधनावरही ते आधारलेलं नाही. यामध्ये तळटीपा नाहीत. नेहरूंचं असामान्य जीवन व कारकीर्द आणि प्रत्येक भारतीयाकरता त्यांनी मागे ठेवलेला वारसा यांचा नव्याने अर्थ लावण्याचा हा प्रयत्न आहे. ‘भारतीय’ या संज्ञेला नेहरूंनी अर्थ दिला. त्यांचं ऋण व्यक्त केल्याशिवाय तिचा वापर करणं अशक्य आहे. भारतीय म्हणून त्यांनी आपल्यासमोर काही आदर्श ठेवले आहेत. हे आदर्श कोठून आले, त्यांनी स्वतः त्या आदर्शाचं पालन केलं होतं का आणि आज ते किती व्यवहार्य आहेत, अशा काही प्रश्नांचा शोध घेण्याचं काम हे पुस्तक करतं. नेहरूंचा प्रशंसक आणि टीकाकार अशा दुभंगलेल्या अवस्थेत हे पुस्तक मी लिहायला घेतलं; पण नेहरूंचं जीवन जितकं खणत गेलो, त्यांच्याविषयीचा आदर तितका खोलवर वाढला.
जवाहरलाल नेहरूंचा आपल्या देशावर इतका मोठा प्रभाव आहे की काळाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या कारकिर्दीचं पुनर्मूल्यांकन करण्याचा मोह व्हावा. भले त्यांची प्रत्येक गोष्ट आपल्याला पटो न पटो, आपल्याला त्यांचा वारसा लाभलेला आहे. आपण भारतीय आज चांगले-वाईट जे काही आहोत त्यासाठी आपण या एका माणसाचे ऋणी आहोत. ही त्याची कहाणी आहे.
– शशी थरूर (या लेखाचा उर्वरित भाग वाचा पुस्तकामध्ये)
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.