Rough Sketches by Subhash Awchat | रफ स्केचेस
– सुभाष अवचट
चित्रकार ही एक वेगळीच प्रजाती असते. जग त्यांना वेगळंच दिसत असतं. त्यावर प्रोसेस करणारा त्यांचा मेंदूही वेगळाच असतो. चित्रं पाहून चित्रकाराला काय म्हणायचं असेल याचा आपण केवळ अंदाज बांधू शकतो; पण त्याच्या विचारविश्वात डोकावण्याची, विचारांमागची प्रोसेस समजून घेण्याची संधी आपल्याला मिळत नाही.
प्रख्यात चित्रकार सुभाष अवचट यांनी रेखाटलेली ही रफ स्केचेस आपल्याला तीच विरळा संधी देतात. आयुष्यात भेटलेली माणसं, त्यांचं वेगळेपण, स्वतःची चित्रं, त्या चित्रांमागचा विचार, त्यामागची प्रोसेस, जगभरातले चित्रकार, त्यांचं म्हणणं, माणसाला व्यापून असलेल्या भाव-भावना अशा नाना गोष्टींना सहजपणे कवेत घेत जाणारं अवचटांचं लिखाण त्यांच्या चित्रांइतकंच उत्स्फूर्त आणि लखाखतं आहे.
काही दिवसांनी जी. एं.चं पत्र आलं आणि मग पत्रव्यवहाराचा सिलसिला सुरू झाला. त्यांनी मला दीड-दोनशे पत्रं लिहिली आहेत. (ही पत्रं कुठं कुठं प्रसिद्धही झाली आहेत. ‘जी. ए.- एक पोट्र्रेट’ या माझ्या पुस्तकातही त्यातली काही आलेली आहेत.)
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.