Prachyavidya Pandit Sharad Patil Yanchya Athavani प्राच्यविद्यापंडित कॉ शरद पाटिल यांच्या आठवणी
बहुजनांच्या संस्कृत ज्ञानाचा ‘बॅकलॉग’ शरद पाटलांनी भरून काढला!
आर्थिक वर्ग आणि वर्गसंघर्ष यांची भाषा बोलणाऱ्या कम्युनिस्ट पक्षात शरद पाटलांनी जातींची आणि त्यातही ब्राह्मणी-अब्राह्मणी संघर्षाची भाषा आणली. ती पक्षाला खपणं शक्यच नव्हतं… जातींच्या भाषा बोलणाऱ्या पाटलांमध्ये जातीयता, जातीयवाद, जातिमत्सर यांचा लवलेशही नव्हता. त्यांची मांडणी पूर्णतः वैचारिक किंवा ‘अॅकॅडेमिक’ अशीच होती… पाटील ‘वेद, रामायण, महाभारत, संस्कृत नाटकं, नाट्यशास्त्र, बौद्ध व जैनांचे संस्कृत-प्राकृत ग्रंथ’ वाचत आणि वाचतच गेले. बहुजनांच्या संस्कृत ज्ञानाचा ‘बॅकलॉग’ त्यांनी एकट्यानं भरून काढला, असं म्हणण्यात काहीही अतिशयोक्ती नाही… या सर्व विचारप्रक्रियेत पाटलांनी रामायण, महाभारत, बुद्धविचार आदी सगळ्याच गोष्टींचा वेगळा अन्वयार्थ लावला आणि मुख्य म्हणजे वेगळं असं अब्राह्मणी सौंदर्यशास्त्रही सिद्ध केलं…. पाटील यांच्या संशोधनाचे मोल फार मोठं आहे. समताधिष्ठित समाजरचना हवी असलेल्या कुणालाही कॉम्रेड शरद पाटलांना डावलून पुढं जाता येणार नाही.
-डॉ. सदानंद मोरे
(तत्वज्ञान, धर्मशास्त्र, संत साहित्याचे अभ्यासक आणि महाराष्ट्र संस्कृतीचे भाष्यकार)
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 02024453065
Reviews
There are no reviews yet.