Mahatma Jyotiba Phule Nivadak Vangmay
₹350.00 Original price was: ₹350.00.₹280.00Current price is: ₹280.00.
Author : Mahatma Jyotiba Phule
ISBN : 9788119812844
Edition : 2024
Language : Marathi
Publisher : Madhushree Publication / मधुश्री पब्लिकेशन
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Mahatma Jyotiba Phule Nivadak Vangmay
जोतीराव फुले यांचा जन्म १८२७ साली झाला, जोतीरावांचे शिक्षण पुणे शहरातील शाळेत झाले. ती शाळा स्कॉटिश मिशनरी चालवत असत. या शाळेत ते इतर जातीच्या मुलांमध्ये मिसळत असत. त्यात अस्पृश्य जातींची मुलेही असत. तरुण वयातच त्यांनी अहमदनगर येथे अमेरिकन मिशनऱ्यांनी चालवलेल्या मुलींच्या शाळेला भेट दिली होती आणि तिने ते अतिशय प्रभावित झाले होते. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन ऐन विशीत असतानाच त्यांनी कनिष्ठ जातीच्या मुलींकरता शाळा काढण्याची प्रेरणा घेतली. नंतर त्यांनी अनेक शाळा सुरू केल्या. त्या शाळांतून महार, मांग आदी अस्पृश्य जातीच्या मुलांना प्रवेश दिला जात असे.
फुले स्वतःच स्वतःचे शिक्षक होते. तरुणपणी त्यांच्यावर थॉमस पेन यांच्या विचारांचा खूपच परिणाम झाला होता असे दिसते. १८६०च्या दशकापासून फुलेंना आपल्या शाळांच्या नियोजनापेक्षा अधिक व्यापक सामाजिक सुधारणांमध्ये रस निर्माण झाला. उदा. विधवापुनर्विवाह. त्या दरम्यानच ते एक उद्योजक बनून पुण्याच्या आसपासच्या कारखान्यांना कच्चा माल पुरवू लागले. ते रस्ते व पूल बांधणीची कामेही कंत्राटावर घेत असत. त्यात ते चांगलेच यशस्वी झाले. त्यात मिळवलेला पैसा ते आपल्या सामाजिक कार्यासाठी वापरत असत.
१८७०च्या सुमारास फुले हे महाराष्ट्रातील एक वजनदार व महत्त्वाची व्यक्ती म्हणून नावारूपाला आले. त्यांचे जे लिखाण या काळात प्रसिद्ध झाले, त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिकच भारदस्त झाले. १८७३ साली फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.